छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करा.

 

 

 

नारायणराव आरू पाटील,वाशिम/प्रतिनिधी

 

संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जलदुर्ग, सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी मोठ्या थाटामाटात लोकार्पण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा एकाएकी कोसळला असून सदर कामाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात अनियमित्ता व भ्रष्टाचार झाला. छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे.शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झाली झालेली आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब गंभीर आहे.

 

 

या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केले होते. भारतीय नौदलाच्या अधिपत्याखाली या पुतळ्याचे बांधकाम झाले असतांना फक्त हा पुतळा आठ महिन्यात अपमानपद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली, कर्तृत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अपमान आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.

 

 

त्यामुळे शासनाने अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन दोषी असणारावर आणी जबाबदार आणी संबधीत लोकांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करावी.आणी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी.ही जनतेची जनतेच्या वतीने ही मागणी आहे.दोषीवर कारवाई न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत साहेब, वाशिम जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जिल्हाप्रमुख सुरेश भाऊ मापारी,

 

 

जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, रिसोड विधानसभेचे सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप साहेब, उपजिल्हाप्रमुख डॉ.चंद्रशेखर देशमुख, यांच्या मार्गदर्शनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल. अशा आशयाचे निवेदन शिवसेना रिसोड तालुक्याच्या वतीने तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्यामार्फत शासनास पाठवावे असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी रिसोड सदर निवेदनावर रिसोड विधानसभेचे सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप, महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब देशमुख, तालुकाप्रमुख नारायण आरु, तालुका समन्वयक घनश्याम मापारी,

 

 

युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश देशमुख, युवासेनेचे तालुकाप्रमुख गजानन सानप, शहरप्रमुख संजय भाऊ ईरतकर, गजानन काठोळे उपतालुकाप्रमुख, डॉ. रामेश्वर रंजवे, युवासेना उपतालुकाप्रमुख, कैलास ठोकरे युवासेना शहरप्रमुख,दिपक मापारी प्रसिद्धीप्रमुख,सुनील राठोड, अमर देशमुख, प्रल्हाद देशमुख, शिवाजीराव सोनुने ,किशोर काळे, राजू इरतकर, संतोष भिसडे उपाध्यक्ष संतोष भिसडे, राधेश्याम शिरसाट विधानसभा अध्यक्ष,

 

 

अनिल राजुरकर, गजानन खंदारे संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रवक्ता, गोपाल खडसे तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, प्रकाशराव देशमुख इत्यादी कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.याबाबत सर्वांनी निषेध व्यक्त केला.