हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

कल्याणी अमोल भाकरे यांना मोठा सन्मान; राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारीशक्ती राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

On: September 4, 2026 7:32 AM
Follow Us:
कल्याणी अमोल भाकरे यांना राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारीशक्ती राज्यस्तरीय पुरस्कार
बुलढाणा | सचिन खंडारे  

महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सागवान, बुलढाणा येथील कल्याणी अमोलराव भाकरे यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांना प्रतिष्ठेचा राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारीशक्ती सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रोफेशनल फॅशन डिझायनर आणि आर्टिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या कल्याणी भाकरे अनेक गरजू महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देत आहेत. विशेष म्हणजे गरजू मुलींना त्या मोफत प्रशिक्षण देतात. त्यांच्या या कार्यामुळे महिलांना कौशल्य मिळण्यासोबतच स्वावलंबी होण्याची संधी मिळत आहे.

दरवर्षी साखरखेर्डा येथे दिवंगत वृक्षमित्र मधुकर खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. या पुरस्कारासाठी राज्यभरातून विविध क्षेत्रांतील 500 पेक्षा अधिक प्रस्ताव प्राप्त झाले होते.

यामधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यात सागवान येथील कल्याणी अमोलराव भाकरे यांचीही निवड झाली आहे.

कल्याणी भाकरे या प्रोफेशनल फॅशन डिझायनर आणि आर्टिस्ट असून महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. मशीन क्लासेस, केक क्लासेस, मेहंदी, बेकिंग, मेकअप, रंगोली तसेच मॅट प्रकारच्या विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

विशेष म्हणजे गरजू मुलींना त्या मोफत प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला कौशल्य मिळावे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता यावे, या उद्देशाने त्या सातत्याने काम करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कल्याणी अमोल भाकरे यांना राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारीशक्ती सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लवकरच दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सदर पुरस्कारासाठी कल्याणी भाकरे यांची निवड मुख्य संयोजक सचिन खंडारे, निवड समितीचे अध्यक्ष विकास सुखदाने, उपाध्यक्ष समाधान सरकटे आणि सचिव राधेश्याम बंगाळे यांच्या निवड समितीने केली आहे. त्यानंतर कल्याणी भाकरे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

कल्याणी अमोल भाकरे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सागवान तसेच बुलढाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यामुळे महिलांच्या कौशल्यविकासाला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळत असल्याचे कौतुक केले जात आहे.

📲 बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

स्थानिक बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी आणि ताजे अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

📢 बातमी आवडली तर शेअर करा

महिलांना स्वावलंबी बनविणाऱ्या कल्याणी भाकरे यांच्या कार्याची ही प्रेरणादायी बातमी आपल्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत शेअर करा. अशा सकारात्मक कार्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी तुमचा एक शेअर महत्त्वाचा ठरू शकतो.

तुमच्या परिसरातील महत्त्वाची बातमी किंवा सामाजिक उपक्रमाची माहिती आमच्यापर्यंत पाठवा.

🔗 Related News

बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या वाचा

सचिन खंदारे

सचिन खंदारे हे गेल्या १० वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून स्थानिक प्रशासन, ग्रामीण प्रश्न, सामाजिक घडामोडी आणि जनतेच्या मूलभूत समस्यांवरील विश्वासार्ह वार्तांकनासाठी ओळखले जातात. तथ्याधारित माहिती, संतुलित मांडणी आणि क्षेत्रीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी वाचकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

डोणगावातील दोन मित्रांचा नागापूर पुलाजवळ अपघातात मृत्यू

दोन जिवलग मित्रांचा अपघातात मृत्यू; डोणगावात एकाच वेळी अंत्यविधी

पत्रकार छोटू कांबळेंना पत्रकारिता पुरस्कार २०२६ जाहीर झाल्यानंतर प्रतापराव जाधवांच्या हस्ते सत्कार

पत्रकार छोटू कांबळेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२६; प्रतापराव जाधवांच्या हस्ते सत्कार

मोताळ्यात महावितरणविरोधात आमरण उपोषण करताना पृथ्वीराज गायकवाड

महावितरणच्या मनमानीविरोधात मोताळ्यात आमरण उपोषण; पृथ्वीराज गायकवाड मैदानात

लोणारमध्ये दुचाकी चोरीप्रकरणी २० वर्षीय संशयिताला अटक

लोणारमध्ये दुचाकी चोरीचा छडा; २० वर्षीय आरोपीला अटक, पाच दुचाकींसह १.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाड पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सव, पोळा, कावड आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर धाड पोलिसांची मोठी प्रतिबंधात्मक कारवाई; १२ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव

रविकांत तुपकरांची महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; रविकांत तुपकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Comment