दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

म्हातारपणी ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाने बकरीच्या पैशांवरून घेतला वडिलांचा जीव

On: August 31, 2026 8:21 AM
Follow Us:
बकरीच्या पैशांवरून वादानंतर वडिलांचा मृत्यू

चिखली : विशाल गवई 

ज्या मुलाकडून आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाच्या हातून जन्मदात्या वडिलांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना नायगाव बु. येथे घडली. बकरी विक्रीचे पैसे मागण्यावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला. या वादातून मुलाने वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर लोखंडी फुकणीनेही मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मंगरुळ नवघरे येथील नायगाव बु. येथे २९ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. मृतक कचरुबा वामन गायकवाड (वय ६०) हे पत्नी बेबीबाई (वय ५५) आणि कुटुंबीयांसह राहत होते. त्यांना एक मुलगा आणि चार मुली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कचरुबा गायकवाड यांनी त्यांचा मुलगा विनोद कचरुबा गायकवाड (वय ३८) याच्याकडे बकरी विक्रीचे पैसे मागितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

वाद वाढल्यानंतर विनोद याने वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर लोखंडी फुकणीने त्यांच्या पोटावर, छातीवर आणि डोक्यावर मारहाण करण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

मारहाणीत कचरुबा गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

वडील आणि मुलामधील बकरी विक्रीच्या पैशांवरून सुरू झालेला वाद एवढ्या टोकाला जाईल, याची कल्पनाही कुटुंबीयांना नव्हती. या घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चार मुलींच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र हरपल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतकाची पत्नी बेबीबाई कचरुबा गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी विनोद गायकवाड याच्याविरुद्ध अमडापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच अमडापूर पोलिसांनी आरोपी विनोद गायकवाड याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप आणि रायटर प्रदीप चोपडे करीत आहेत.

महत्त्वाचे: घटनेतील आरोप आणि पोलिस तपासातील बाबी न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

📲 ताज्या महाराष्ट्र बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपला जॉइन करा

बुलढाणा आणि महाराष्ट्रातील स्थानिक बातम्या, ब्रेकिंग न्यूज, शेती, हवामान आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट WhatsApp वर मिळवा.


👉 WhatsApp Group Join करा

📢 तुमच्या परिसरातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा: स्थानिक घटना, नागरिकांच्या समस्या किंवा महत्त्वाची माहिती असल्यास आमच्याशी संपर्क साधा. तुमचा आवाज योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

📰 Related News

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

चिखली पोलिसांनी गुजरातमधील वाकानेर येथून फसवणुकीच्या गुन्ह्यातील ४० वर्षीय आरोपीला अटक केली

चिखली पोलिसांची गुजरातमध्ये कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील ४० वर्षीय आरोपीला वाकानेरमधून अटक

लोणारमध्ये कथित अवैध सावकारीप्रकरणी तीन ठिकाणी सहकार विभागाची कारवाई

Lonar News: लोणारमध्ये कथित अवैध सावकारीप्रकरणी ३ घरांवर छापे; कोरे चेक आणि खरेदीखते जप्त

बुलढाणा जिल्हा परिषद CEO भालचंद्र चव्हाण नियुक्ती.

दुष्काळाच्या छायेत बुलढाणा जिल्हा परिषदेला नवे CEO; गुलाबराव खरात यांची बदली, भालचंद्र चव्हाण यांची नियुक्ती

देऊळगाव राजा येथील गॅरेजमधून चोरीला गेलेला दहा चाकी टाटा ट्रक

Deulgaon Raja News: देऊळगाव राजात गॅरेजमधून दोन लाखांचा दहा चाकी ट्रक रातोरात चोरीला; पोलिसांत गुन्हा दाखल

देऊळगाव राजा हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत उपस्थित प्रश्न

देऊळगाव राजा हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; ठाणेदारांच्या कार्यवाहीची चौकशी होणार?

लोणार सरोवरातील पाण्याखाली गेलेले कमळजा माता मंदिर

लोणारचे कमळजा माता मंदिर पाण्याखाली; संरक्षणासाठी लोणारकर मैदानात, दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

Leave a comment