नारायणराव आरु पाटील, वाशिम/ प्रतिनिधी
आगामी पार पडणारे गणेश उत्सव, ईद-ए-मिलाद उत्सव तसेच गोकुळाष्टमी, पोळा व कर या संबंधाने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन दि.२१आॅगष्ट २०२४ ला मा. पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशन रिसोड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीय करीता रिसोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक भूषण गावंडे साहेब, महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री दराडे साहेब ,नगरपरिषद रिसोडचे श्री काळे साहेब हे उपस्थित होते.
सदर देशातील कायदा व सूव्यवस्था परिस्थिती संबंधाने श्री दराडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की सोशल मीडियाचा योग्य वापर करून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे, आक्षेपार्ह पोष्ट सोशल मीडियावर प्रकाशित न करण्याच्या सूचना दिल्या. श्री गणेशोत्सवाचे संबंधाने पोलीस निरीक्षक श्री गावंडे साहेब यांनी गणेशोत्सव काळात आवश्यक त्या सर्व परवानगी घेऊनच श्री गणेश मंडळाची स्थापना करण्याच्या सूचना देऊन ध्वनी प्रदूषणा विषयाचे संबंधित पालन करून उत्सव काळात भारतीय नागरिक सुरक्षा संस्था प्रमाणे ८० ते १०० समाजकंटकावर तडीपरीची कार्यवाही करण्यात येत आहे.
याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाची व तालुक्यातील पोलीस प्रशासन यांची निगराणी असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी गणेशोत्सव मंडळ अधिकारी पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. शांतता समितीची मीटिंग दरम्यान नगरपरिषद कडून केलेल्या कामाच्या सुचना सुद्धा देण्यात आल्या. ईद-ए-मिलाद उत्सवाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी शांततेत मिरवणूक काढण्याचे आवाहन पोलीस स्टेशन कडून करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील संघटनेचे मंगेशराव सरनाईक, माजी नगरसेविका श्रीमती पप्पीबाई कदम,श्री जुल्फिकार भाई, शहा फैसल, यांनी आगामी सण- उत्सवा दरम्यान महत्त्वाची माहिती दिली . यावेळी पत्रकार बांधव, गणेश मंडळाचे सदस्य, कावड मंडळ सदस्य, शांतता समिती सदस्य, व इतर पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते. आगामी काळात येणारे सर्व उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन रिसोड पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.