रिसोड नगरपरिषद समोर रामनगर, इंदिरानगर, गौसपुरा जमिनीची शासकीय मोजणी करण्यासंदर्भात भारत गुंजकर यांचे उपोषण.

 

 

नारायणराव आरु पाटील / प्रतिनिधी 

 

नगर परिषद समोर भारत बंद कर यांचे उपोषण सुरू.रिसोड शहरातील अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या रामनगर, इंदिरानगर, गौसपुरा येथील शासकीय जमिनीची अद्यापही मोजणी न झाल्याने तेथील रहिवाशांना नगरपरिषद जागेसंदर्भात आठ देत नसल्याने गरिबांना मिळणाऱ्या घरकुलाबाबत व इतर लाभाबाबत लाभ मिळत नाही. तीनही नगरातील जमिनीची शासकीय मोजणी न झाल्याने आठ देता येत नाही असं नगर परिषदेतून सांगण्यात येते.

 

 

परंतु महसुल विभागाकडून व नगरपरिषद या बाबीची दखल घेत नाही व तसा आदेश भूमी अभिलेख कार्यालयाला सुद्धा देत नाही.या जमिनीची मोजणी नियमाकुल करण्यासाठी या तीनही नगरातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे. असे न झाल्यास रिसोड नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यासंदर्भात भारत गुंजकर यांनी रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांना या अगोदरच निवेदन दिले होते. त्या निवेदनामध्ये रिसोड भागातील तथा क्षेत्रातील सर्वे नंबर ४४१ मधील रामनगर, इंदिरानगर, गौसपुरा येथील शासकीय जमिनीवर लोक १९६५ पासून वास्तव्यात असल्याचे सांगतात.

 

 

या बाबीची गंभीर दखल घेण्यासाठी आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पासून भारत जगन्नाथ गुंजकर हे नगरपरिषद समोर उपोषणाला बसत आहेत जोपर्यंत ही मागणी नगरपरिषदेकडून पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे भारत गुंजकर यांनी सांगितले.