हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

‘फक्त एक प्रत हवी होती’… पण 20 हजारांची लाच! धक्कादायक! मेहकरात महसूल अधिकाऱ्याला ACB ने रंगेहात पकडलं

On: April 17, 2026 10:57 AM
Follow Us:
मेहकर ACB कारवाईत महसूल अधिकाऱ्याला 20 हजारांची लाच घेताना पकडले

मेहकर| कट्टा न्यूज नेटवर्क 

मेहकर ACB कारवाईमुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. मेहकरात महसूल विभागातील सहाय्यक अधिकाऱ्याला 20 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका साध्या आदेशाच्या प्रतीसाठी पैसे मागितल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक महसूल अधिकारी कैलास भगवान मुरकुट (वय 46) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने गुरुवारी सापळा रचून अटक केली. ते ‘प्रस्तुतकार-1’ या पदावर कार्यरत असून बालाजी नगर परिसरात वास्तव्यास आहेत.

या प्रकरणातील तक्रारदार हे वकील असून त्यांच्या पक्षकाराच्या जमिनीच्या फेरफार रद्द संदर्भातील अपीलावर 23 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम आदेश झाला होता. मात्र, त्या आदेशाची मूळ प्रत देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने 20 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर प्राथमिक पडताळणीत लाच मागणीची पुष्टी झाली. त्यानंतर 16 एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील त्यांच्या कक्षातच आरोपीने लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सुरू असून अधिक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली.


👉 Related News


📢 हे नक्की करा..

अशाच ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
ही बातमी शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही अपडेट ठेवा.

 

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा येथे झालेल्या पटवारी संघाच्या सभेत विजेंद्र धोंडगे यांची सलग ९वी निवड

बुलढाणा Breaking: विजेंद्र धोंडगे यांची सलग ९वी निवड, ‘ट्रिपल हॅट्ट्रिक’; वाकदकरांची सचिवपदी ‘हॅट्ट्रिक’

बुलढाणा मध्ये मंत्री बावनकुळे यांनी चिखली प्रांत अधिकाऱ्यावर कारवाई

मंत्री बावनकुळेंचा तडकाफडकी निर्णय! चिखली प्रांत अधिकारी सक्तीच्या रजेवर, बुलढाण्यात खळबळ – नेमकं काय घडलं?

वाशिममध्ये थार जीपने ७ वाहनांना धडक दिल्यानंतरचे दृश्य

धक्कादायक! वाशिममध्ये भरधाव ‘थार’चा कहर, ७ वाहनांचा चुराडा – ४ जण गंभीर

रिसोड शहरात पिवळसर पाणीपुरवठा, नागरिक पाणी संकटामुळे हैराण

रिसोडमध्ये पाण्याचा मोठा संकट: पिवळ्या पाण्यामुळे नागरिक हैराण, आठवड्यातून फक्त एकदाच पुरवठा

ST बसमध्ये महिला कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद झाल्याचा व्हायरल व्हिडिओ

Viral Video: ST बसमध्ये महिला कंडक्टरचा संताप, ‘तू कोण कलेक्टर आहे का?’ म्हणत प्रवाशांशी वाद

समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ भीषण बस अपघातानंतर जखमी प्रवासी आणि दुर्घटनेचे दृश्य

रिल्सच्या नादात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! बसच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी

Leave a Comment