हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

धक्कादायक! ९२ वर्षांच्या आजीला चाकूचा धाक दाखवून १३ लाखांची लूट; ३ महिन्यांपासून फरार ‘बाली’ अखेर अटकेत

On: April 1, 2026 12:34 PM
Follow Us:
साखरखेर्डा येथे ९२ वर्षांच्या आजीच्या लूटप्रकरणी बाली अटकेत

साखरखेर्डा |१ एप्रिल २०२६

साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत हनवतखेड येथे ९२ वर्षांच्या वृद्ध आजीला चाकूचा धाक दाखवून दागिने लुटण्याच्या प्रकरणात तीन महिन्यांपासून फरार असलेली मुख्य आरोपी इंदुबाई उर्फ ‘बाली’ गजानन महाजन हिला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्राप्त माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी सुमन श्रीराम चव्हाण (वय ९२) या आपल्या घरी झोपलेल्या असताना अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी घराच्या मागील दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी झोपेत असलेल्या आजीच्या अंगावरील दागिने काढण्यास सुरुवात केली.

नाकातील नथ काढताना आजीला जाग आली असता आरोपींनी चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील सर्व दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. यात सोन्याच्या बांगड्या, पोत आणि कानातील दागिन्यांचा समावेश होता. त्या काळातील किमतीनुसार ५६ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता, मात्र आजच्या बाजारभावानुसार त्याची किंमत तब्बल १३ लाख रुपये आहे.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या प्रकरणी अनिल चव्हाण यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली होती, मात्र मुख्य आरोपी ‘बाली’ फरार होती.

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की बाली ही मोहदरी येथे आपल्या माहेरी शेतात लपून बसली आहे. बीट जमादार निवृत्ती पोफळे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून २४ मार्च रोजी तिला अटक केली.

न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील निलेश महाजन आणि रामेश्वर हामरे हे दोघे आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी अटक आरोपींकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

हे पण वाचा…


👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या आणि WhatsApp वर अपडेट मिळवा.

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा येथील डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात बेकायदेशीर जैव उत्तेजक खतांचा साठा जप्त करताना कृषी विभागाचे अधिकारी

डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात बेकायदेशीर जैव उत्तेजक खतांचा साठा; ‘कृषी मित्र’ भरतीवर फसवणुकीचा गंभीर आरोप

मेहुणाराजा येथे शहीद अंकुश महादेव मिसाळ यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

मेहुणाराजाच्या वीरपुत्र शहीद अंकुश मिसाळ यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

जानेफळ येथे दोन ज्वेलर्स दुकाने फोडून 1.43 लाखांचे चांदीचे दागिने चोरी

एकाच रात्री दोन ज्वेलर्स दुकाने फोडली; 1.43 लाखांचा ऐवज लंपास, चोरट्यांचा शोध सुरू

Indian Navy Recruitment मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील वरोडी येथील शेतकरी कन्या कु. कोमल अनंता गवई हिची भारतीय नौदलात निवड.

Indian Navy Recruitment: बुलढाण्यातील शेतकरी कन्या कोमल गवईची भारतीय नौदलात निवड; मेहनतीने साकारले देशसेवेचे स्वप्न

देऊळगाव राजा तालुक्यातील असोला फाटा येथील नागरे पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या ऋषीकेश गजानन भागीले प्रकरणाचे प्रतिनिधिक छायाचित्र

देऊळगाव राजा : अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत 27 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालक फरार

मोताळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेताची पाहणी करताना आमदार धर्मवीर संजू गायकवाड.

अवकाळी पावसाचा कहर! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार संजू गायकवाड; प्रशासनाला तातडीचे आदेश

Leave a Comment