हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

एका मताने जिंकले, पण बहुमताने गमावले! खैरव-बारलिंगा सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर

On: March 31, 2026 7:52 AM
Follow Us:
खैरव बारलिंगा ग्रामपंचायत सरपंच अविश्वास ठराव

सिंदखेडराजा (प्रतिनिधी) |३१ मार्च २०६

सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एका मताने निवडून आलेल्या सरपंच सौ. नलिता राजेंद्र गरड यांच्यावर अखेर बहुमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे गावातील राजकीय वातावरण तापले असून सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

तहसीलदार अजित दिवटे यांच्या निर्देशानुसार ३० मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बहुमताने अविश्वास ठराव पारित करण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीतील सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा आहे.

ग्रामपंचायत सदस्यांनी सादर केलेल्या ठरावात सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरपंच कोणतेही निर्णय घेताना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, तसेच काही निर्णय जनहिताच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे गावातील विकासकामांना अडथळा निर्माण झाल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.

तसेच प्रशासनात समन्वयाचा अभाव, विकासकामांमध्ये अनियमितता, सदस्यांशी सहकार्याचा अभाव आणि पारदर्शकतेचा अभाव ही प्रमुख कारणे ठरावात नमूद करण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे, सरपंचांच्या पतीकडून ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप होत असल्याचाही गंभीर आरोप सदस्यांनी केला आहे. या सर्व कारणांमुळे सदस्यांमध्ये नाराजी वाढत गेली आणि अखेर त्यांनी एकत्र येत अविश्वास ठरावाचा निर्णय घेतला.

आज झालेल्या मतदानात विद्या संजय लहाने, प्रकाश रामभाऊ गरड, नंदा श्रीकृष्ण तळेकर, दत्तू त्र्यंबक तळेकर, अलका सुधाकर नागरे, जनार्धन विक्रम नागरे, मीनाक्षी विनोद म्हस्के, सुनीता सुरेश भालेकर आणि स्वाती शिवानंद खेडेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.

दरम्यान, या निर्णयामुळे खैरव-बारलिंगा ग्रामपंचायतीतील पुढील सरपंचपदासाठी राजकीय हालचालींना वेग येणार असून गावात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू आहे.


👉 संबंधित बातम्या

👉 अधिक अपडेटसाठी Kattanews.in ला भेट द्या

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

गवंढाळा ग्रामपंचायत अधिकारी निलंबित

“जनतेच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल!”; गवंढाळा ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई

चिखलीतील श्रीराम पतसंस्था ते बैल जोडी चौक रस्त्याची दुरवस्था आणि मनसे आंदोलनाचा इशारा

चिखलीत श्रीराम पतसंस्था ते बैल जोडी चौक रस्त्याचा प्रश्न पेटला; ३-४ दिवसांत काम सुरू करा, मनसेचा आंदोलनाचा इशारा

कोलारा गावातील दूषित पाण्याच्या प्रश्नावर मनसेची फिल्टर प्लांटची मागणी

कोलारा गावच्या दूषित पाण्यावर मनसे आक्रमक; BDO यांना धारेवर धरत फिल्टर प्लांटची जोरदार मागणी

खामगावातील वाडी येथे चबुतऱ्यावर बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

संत गजानन महाराजांच्या पुतळ्यासाठीच्या चबुतऱ्यावर रातोरात शिवाजी महाराजांचा पुतळा; खामगावात चौघांवर गुन्हा

मेहकरमध्ये खरीप २०२५ पिकविम्यासाठी शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांचे आंदोलन

अतिवृष्टीची मदत मिळते, मग पिकविमा नामंजूर कसा?; मेहकरमध्ये शेतकरी नेते पांडुरंग पाटील आक्रमक

देऊळगाव राजात पाच हजार रुपयांसाठी आईवर वीट मारल्याची घटना

जिच्या कुशीत वाढला, तिच्याच डोक्यात घातली वीट! पाच हजारांसाठी मुलाचा आईवर हल्ला; देऊळगाव राजात गुन्हा दाखल

Leave a Comment