बुलढाणा|२४ मार्च २०२६
बुलढाणा नामांतर आणि राजमाता जिजाऊ नगर या मागण्यांनी सध्या जिल्ह्यात राजकीय व सामाजिक चर्चेला उधाण आले आहे. बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशीही ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने करण्यात आली आहे.
रिपाई आठवले गटाच्या शिष्टमंडळाने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांना निवेदन सादर करून या दोन्ही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. या मागणीमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या ओळखीत ऐतिहासिक व सांस्कृतिक बदल होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्रात यापूर्वी अनेक शहरांचे नामांतर झाले आहे. त्याच धर्तीवर स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला “राजमाता जिजाऊ नगर” हे नाव देणे योग्य ठरेल.
या नामांतरामुळे राजमाता जिजाऊ यांचा सन्मान होईल तसेच जिल्ह्याची ओळख जागतिक स्तरावर अधिक बळकट होईल. विशेषतः लोणार सरोवर, संग्रामपूर येथील बौद्ध स्तूप आणि शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक प्रसिद्धी मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
तसेच बुलढाणा येथील नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे. यामुळे सामाजिक समतेचा संदेश अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी या निवेदनाचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, ही मागणी विधानभवनात मांडली जाईल, असे सांगितले आहे.
या वेळी रिपाई आठवले गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 Related News
- बुलढाण्यात बोगस प्रमाणपत्र प्रकरण; १५ कर्मचारी निलंबित
- लोणार सरोवर परिसरात पर्यटनाला चालना देण्याची योजना
- शिवजयंती मिरवणुकीत राडा; अनेक जण ताब्यात
📢 हे आवश्यक करा
अशाच ब्रेकिंग आणि व्हायरल स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या आणि अपडेट राहा.










