हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

समृद्धी महामार्गावर लोखंडी जाळी चोरी प्रकरण उघड; मनसे तालुका अध्यक्षासह तिघे अटकेत, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

On: March 14, 2026 7:10 PM
Follow Us:
समृद्धी महामार्गावरील लोखंडी जाळी चोरीप्रकरणी तिघांना किनगाव राजा पोलिसांनी अटक
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

सिंदखेडराजा | १४ मार्च २०२६ :

समृद्धी महामार्गालगत बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या व अँगलची चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना किनगाव राजा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ मार्च २०२६ रोजी किनगाव राजा पोस्ट परिसरातील समृद्धी महामार्गालगत बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या व अँगल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा शोध घेत असताना सिंदखेड राजा मनसेचे तालुका अध्यक्ष अभि देशमुख, विलास दुंडियार (रा. दुसरबीड) व देवानंद डोईफोडे (रा. केशव शिवणे) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिल्याचे समोर आले. या कारवाईदरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेल्या लोखंडी जाळ्या व अँगलसह अंदाजे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले टाटा एस (छोटा हत्ती) वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे पण वाचा..

बुलढाण्यात धक्कादायक सायबर गुन्हा! मोबाईल हॅक करून महिलेला Video Call वर विवस्त्र केलं; शारीरिक संबंधांची मागणी

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सध्या जालना येथील चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. किनगाव राजा हद्दीतील समृद्धीसह राज्य महामार्गावरील अनेक ठिकाणी जाळी चोरी झाल्याच्या तक्रारी असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस हवालदार विष्णू मुंढे, पोलीस कॉन्स्टेबल जीवन जयभाये आणि गणेश वारकरी यांनी केली असून प्रकरणाचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस करत आहेत.


Related News :

हे आवश्यक करा :

अशाच ब्रेकिंग आणि स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in नियमित भेट द्या.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Leave a Comment