लोणार सरोवर परिसरात महिलेने केला 30 वर्षीय युवकाचा गळा दाबून खून.सरोवर परिसरातील घनदाट जंगलात परभणी जिल्ह्यातील सेलू येथील ३० वर्षीय युवकाचा गळा दाबून खून केल्याची घटना सोमवारी, ५ आगस्ट रोजी उघडी आली. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचे सेलू पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील महिला आरोपीला सेलू पोलिस लोणार सरोवर परिसरातील घटना स्थळावर घेऊन आले होते.
सरोवर परिसरातील विरळ झुडपात ३० वर्षीय तरुणाचा महिलेने आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने गळा दाबून खून केल्याची घटना २ ऑगस्ट रोजी घडली. मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी हरविला असल्याची तक्रार सेलु पोलिस स्टेशनला दिली होती. पोलिस स्टेशनला दाखल झालेल्या तक्रारी वरून सेलू पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत महिलेला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवत महिलेकडून हकीकत जाणन घेतली.
मिळालेल्या महितीच्या आधारे सेलू पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात महिलेने दिलेल्या माहिती वरून लोणार सरोवरातील घनदाट जंगलात तरुणाचा शोध घेतला. सरोवर परिसरातील यज्ञेश्वर मंदिरापासून २०० मीटर अंतरावर नाल्याच्या काठावरील झुडपात तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.