crime news : १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर स्थानिक नेत्याने केला सामूहिक बलात्कार

crime news

crime news : अयोध्येतील एका स्थानिक नेत्याने आणि त्याच्या साथीदारांनी १२ वर्षांच्या मुलीवर केलेल्या ‘सामूहिक बलात्काराच्या’ प्रकरणाची स्वतःहून दखल घेत, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आयोगाने अयोध्येच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना याबाबत पत्र पाठविले असून, आरोपांचे गांभीर्य दाखविले आहे.

 

 

 

मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला होता, त्यापैकी एकाचा समाजवादी पक्षाशी संबंध असल्याचा आरोप आहे. आरोपींनी घटनेचा व्हिडीओ बनवून व्हायरल video viral केला होता. संबंधितांवर तत्काळ आणि कठोर कारवाईची विनंती आयोगाने केली आहे. आयोगाने अयोध्या एसएसपींना तीन दिवसांत कोणती पावले उचलली याचा अहवाल मागितला आहे. पीडितेला तत्काळ सर्व ती मदत देण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत.