आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू.

 

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे जात ज्या ठिकाणी मिटकरी बसलेले होते, त्या ठिकाणी धाव घेऊन घोषणाबाजी करून त्यांच्या गाडीची तोडफोड केली. तर, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले.

 

 

या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवरले. दरम्यान, हा सर्व घटनाक्रम होत असताना अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष जय मालोकार (२५) रा. मोठी उमरी यांना छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांच्या अंगाला दरदर घाम सुटल्यानंतर जय यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.