हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेरा बुद्रुक (खडका शिवार) येथे श्री गजानन महाराज प्रकटदिनी भाविकांचा महाप्रसादासाठी जनसागर; हजारो भक्तांची उपस्थिती

On: February 11, 2026 8:12 AM
Follow Us:
मेरा बुद्रुक खडका शिवार येथे श्री गजानन महाराज प्रकटदिनी महाप्रसादासाठी जमलेले भाविक

मेरा बु.| ११ फेब्रुवारी २०२६

मेरा बुद्रुक (खडका शिवार) येथे श्री गजानन महाराज प्रकटदिन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारो भाविक भक्तांनी श्री गजानन महाराजांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

प्रकट दिनाच्या दोन दिवस अगोदर श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण भक्तांच्या उपस्थितीत पार पडले. तिसऱ्या दिवशी ह.भ.प. श्री खडके महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

प्रकट दिनी सकाळी महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण सुरू झाले. महिला व पुरुष सेवाधारी मंडळींनी भक्तिभावाने सेवा दिली.

महाप्रसादाचे वितरण मुख्यमंत्री ना. मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधरजी महाले यांच्या हस्ते करण्यात आले.

हे पण वाचा..

साखरखेर्डा येथून बेपत्ता मुलीचा शोध लागला; काकू, युवकासह दोन आरोपी अटकेत – मानवी तस्करीचा धक्कादायक खुलासा!

या कार्यक्रमास आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, माजी आमदार शशिकांतजी खेडेकर, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विजयजी कोठारी, विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक व राजकीय पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त उपस्थित होते.

श्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने भक्ती, सेवा व श्रद्धेचा संगम अनुभवायला मिळाला. ग्रामस्थ व सेवाधाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.


Related News :

अशाच धार्मिक, सामाजिक व स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा श्री व्यंकटेश महाविद्यालयातील अभिजात मराठी भाषा सप्ताह कवी संमेलन

देऊळगाव राजात अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कवी संमेलन; साहित्यिकांनी समाज जागृत ठेवावा – डॉ. शशिकांत पाटील

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा परिसरात वाळत चाललेली कपाशीची झाडे

सिंदखेडराजा तालुक्यात २० हजार हेक्टरवरील कपाशी बाधित; कापूस येण्याआधीच पाती गळाली, शेतकरी संकटात

पिक कर्जासाठी स्टॅम्प पेपरच्या सक्तीबाबत बँकांना निर्देश

पिक कर्जासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर नको; संजय खडसेंचे बँकांना स्पष्ट निर्देश

सोमठाणा तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीच्या आत्मसमर्पणाची बातमी

सोमठाणा तिहेरी हत्याकांडात मोठी घडामोड; मुख्य आरोपी दीपक सुरडकर पनवेलमध्ये शरण, मुलालाही अटक

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात MPSC विद्यार्थ्यांचे निवेदन

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी डॉ. ज्योतीताई खेडेकर मैदानात; ३५० ते ४०० विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चिखली तालुक्यात अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची कारवाई

चिखलीत अनधिकृत पाणी उपसा केल्यास पंप जप्त होणार; वीजपुरवठा खंडित करण्याचाही इशारा

Leave a comment