हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोडमधील संत ज्ञानेश्वर विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात; मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण

Follow Us:
रिसोड तालुक्यातील संत ज्ञानेश्वर विद्यालयातील प्रजासत्ताक दिन सोहळा

रिसोड |२८ जानेवारी २०२६

संत ज्ञानेश्वर विद्यालय वाडी रायताळ तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकरखेडा येथील माननीय भागवतरावजी रंजवे हे उपस्थित होते, तर संस्थेचे सचिव म्हणून ज्ञानेश्वर रंजवे यांनी कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिंचांबापेन येथील माननीय समाजसेवक, संत गजानन महाराज भक्त संतोष भाऊ मुंदडा उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून वाशिम येथील सुरेशभाऊ सोमाणी यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

यानंतर प्रमुख पाहुणे माननीय संतोष भाऊ मुंदडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. भोकरखेडा येथील सदस्य एकनाथराव भोकरे, कुंडलिक गायकवाड, भागवत मानवतकर, संभाजीराव गवळी, ग्रामपंचायत सरपंच राधाबाई लक्ष्मण हागे, उपसरपंच राजू पठाण यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

यावेळी माननीय संतोष भाऊ मुंदडा यांचा शाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेला कपाट स्नेहभेट म्हणून दिले तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसांचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. डी. लांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ रामदास गोटे, आत्माराम खंदारे, जनार्दन भोरकडे, माधव गवई यांनी परिश्रम घेतले. शाळेचे मुख्याध्यापक अनंत खंदारे, के. डी. तपासे, आर. मानवतकर, अनंत मोरे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आभार बी. एन. खंदारे यांनी मानले.


👉 अधिक स्थानिक व ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.

हे पण वाचा 

ajit pawar death news : बारामती विमान अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन – सूत्रांची माहिती

“सिकलसेलमुक्त भविष्यासाठी रक्तचाचणी गरजेची!” – ना. प्रतापराव जाधव यांचे आवाहन

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक २०२७ पाहताना महाराष्ट्रातील विद्यार्थी

दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! पाहा, परीक्षा कधीपासून सुरू होणार

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

Leave a Comment