shivshahi bus accident : अकोला-खामगाव महामार्गावर शिवशाहीला आग ; ४४ प्रवाशी थोडक्यात बचावले

shivshahi bus accident

shivshahi bus accident : शेगाव येथून अकोला शहराकडे येत असलेल्या शिवशाही shivshahi बसला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना गुरूवारी (२५ जुलै) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास अकोला- खामगाव akola-khamgao मार्गावरील रिधोरा ridhora गावानजीक घडली. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील ४४ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले.

 

 

 

बस मात्र पूर्णपणे जळून खाक झालीअकोला क्र. २ आगाराची (एमएच ०९, ईएम १७९२) क्रमांकाची अकोला ते शेगाव ही वातानुकूलित शिवशाही बस सकाळी अकोला मध्यवर्ती बसस्थानक येथून शेगावला गेली होती. शेगाव येथून परत येत असताना बस रिधोरानजीक आली असता, केबिनमधील डॅशबोर्डमधून धूर येत असल्याचे चालक पी. एन. डोंगरे p.n dongare यांच्या लक्षात आले. काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याची शंका येताच त्यांनी प्रसंगावधान राखत अशोक लेलैंड ashok lelaind शोरूमसमोर बस थांबवली व बसमधील सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर बसच्या केबिनने पेट घेतला.

 

 

 

चालक डोंगरे यांनी बसमधील अग्निशमन यंत्राद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही. पाहता-पाहता ‘आगीने रौद्ररूप’ धारण केले व संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चार ते पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. एसटीच्या अधिकऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.

 

 

 

डॅशबोर्डमध्ये तांत्रिक बिघाड

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या शिवशाही बसमध्ये चालकाच्या समोर डॅशबोर्ड असतो. या डॅशबोर्डमध्ये असलेल्या वायरिंगला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. वायरिंगमुळे ही आग काही मिनिटांतच संपूर्ण बसमध्ये पसरली.