हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

पांगरी काटे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांच्या वेशभूषेने वेधले लक्ष

On: January 14, 2026 6:46 PM
Follow Us:
पांगरी काटे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करताना विद्यार्थी

पांगरी काटे | १४ जानेवारी २०२६

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळा पांगरी काटे येथे संयुक्त जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. या वेळी विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा परिधान करत राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र काटे यांनी पुष्पहार अर्पण केला. तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रतिनिधी मनोहर काटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा साकारत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व सादरीकरण पाहून पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमात शाळेचे सहाय्यक शिक्षक खरात सर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला. जिजाऊंच्या संस्कारातूनच स्वराज्याची बीजे रोवली गेली, तर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून समता, बंधुता आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण मिळते, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती, पत्रकार समाधान सरकटे, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर पराड सर यांनी केले.


📢 आपल्या गावातील बातम्या वाचा KattaNews.in वर

आपल्या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक व ग्रामीण घडामोडी सर्वात आधी वाचण्यासाठी KattaNews.in ला रोज भेट द्या.
👉 बातमी, फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.


🔗 संबंधित बातम्या

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर पंचायत समिती माहिती अधिकार कारणे दाखवा नोटीस

माहिती अधिकाराच्या आदेशाची पायमल्ली? मेहकर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाची कारणे दाखवा नोटीस

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचे पथसंचलन

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त; पथसंचलनातून दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक

सहकार्य गणेश मंडळ चिखली यांच्या वतीने वृक्षवाटप व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम

सहकार्य गणेश मंडळ चिखलीचा सामाजिक उपक्रम १०१ वृक्षांचे वाटप, २१ रक्तदात्यांचे रक्तदान आणि महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन

राहुल बोंद्रे संजय गायकवाड बुलढाणा राजकारण वाद

राहुल बोंद्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय गायकवाडांचा मोठा दावा; “तक्रारींचा पाढा वाचत त्यांना पक्षप्रवेशासाठी मेटाकुटीला आणले”

रायपूर भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी

रायपूरच्या भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करा; कारवाई न झाल्यास ३० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

"श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन"

श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न

Leave a Comment