Washim : घरकुल लाभार्थी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत, तर काहींना घरकुल बांधकामात अडथळा आणणाऱ्यांवर ग्रामपंचायतचा नाही वचक.

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी- नारायणराव पाटील 

 

रिसोड तालुक्यातील रिठद येथील वयोवृध्द रमाई घरकुल लाभार्थी नर्मदाबाई खंदारे यांना घरकुलाचा पहिला हप्ता भेटल्यानंतर तात्काळ त्यांनी आपल्या घराच्या ओट्याचे काम पूर्ण केले. याबाबत संबंधित अभियंता यांना २९ आ‌ॅगष्ट पासून तीन वेळा सुचित करण्यात आले.परंतू घरकुलाचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर काम पूर्ण केले असता दुसऱ्या हप्त्यासाठी वाट पहावी लागत आहे परंतु अद्याप तरी दुसरा हप्ता खात्यामध्ये पडला नाही पडला नाही पण आता पडला असेल तर खाते होल्ड केले असेल. त्यामुळे नर्मदाबाई खंदारे या वयोवृध्द घरकुल लाभार्थीला समजायला मार्ग नाही या महिलेला मुलगा नाही, नातू आहे.

 

 

 

आणि लहान आहे त्यामुळे ओट्यावरील टिनपत्रापर्यंत बांधकाम करण्यासाठी पैशाची गरज आहे. आणि ती महिला घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी तयार असतांना सुद्धा अद्याप पर्यंत तरी दुसरा हप्ता रमाई घरकुलाच्या माध्यमातून मिळाला नाही. तरी याबाबतची दखल गटविकास अधिकारी रिसोड व रिठद ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी हे घेतील अशी अपेक्षा नर्मदाबाई महादू खंदारे यांनी व्यक्त केली. तर चंद्रभागा बळीराम खंदारे या महिलेला पहिला हातात मिळाला त्याची बांधकामही ओट्या पर्यंत पूर्ण केले. परंतु शेजारी बांधकामात अडथळा आणत असल्याचे समजते. याबाबत वादही झाले.

 

 

त्याबाबतचा रिपोर्ट पोलीस स्टेशन ग्रामीण वाशिमला दिला आहे. याबाबत संबंधित पोलीस उपनिरीक्षक नंदकुले यांनी समज सुद्धा दिलेली आहे. परंतु अडथळा आणणाऱ्यांना अद्याप तरी समज आली नाही. त्यामुळे परत चंद्रभागा बळीराम खंदारे यांनी बैठक ग्रामपंचायतचे ग्राम पंचायत अधिकारी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांना सुद्धा याबाबत अवगत केले व मला माझ्या घरकुल बांधकामात अडथळा आणत असलेल्या समज देऊन माझ्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करता यावे करिता आपण माझ्या बांधकामात होत असलेला अडथळा दूर करावा व आम्हाला निवारा बांधता येईल असे करावे. आम्हाला कोणताही निवारा नाही असे बोलताना सांगितले. अशी माहिती चंद्रभागा बळीराम खंदारे यांनी दिली आहे.