वाशिम मतदार संघात डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांची उमेदवारी दाखल.

वाशिम

 

 

रिसोड तालुका प्रतिनिधी /नारायणराव आरु पाटील

वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप जाधव सहसंपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर जिल्हाप्रमुख सुरेश भाऊ मापारी व खासदार संजयभाऊ देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दिलीपरावजी सरनाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे, जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे, महिला आघाडी मंगलाताई सरनाईक, राजूभाऊ चौधरी इत्यादी महाविकास आघाडीचे सर्वच नेते आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी डॉ. सिद्धार्थ देवळे यांचा विधानसभेचा उमेदवार अर्ज भरण्याकरता सर्वच उपस्थित होते.

 

 

 

 

वाशिम तथा मंगरूळनाथ तालुक्यातून अनेक कार्यकर्ते महिला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते .अर्ज भरण्याची रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून करण्यात आली. पाटणी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मार्गे तहसील कार्यालय असा रॅलीचा मार्ग होता. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुद्धा हार अर्पण करत रॅली पुढे जात होती. दरम्यान आचारसंहितेच्या निंबाप्रमाणे मोजक्या कार्यकर्त्यासह उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वाशिम विधानसभा यांच्याकडे दाखल केला. जनतेचा भरघोस प्रतिसाद पाहता ही निवडणूक जड जाणार नाही असे सध्या तरी चित्र दिसते. सध्याचे भारतीय जनता पार्टीचे वाशिम मतदार संघाचे कार्यरत आमदार लखन मलिक यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज आहे. त्यांचे ऐवजी श्याम खोडे यांना तिकीट झाल्याने काही खुशी कही गम अशी परिस्थिती सध्या वाशिम मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्याची आहे. वाशिम मतदार संघात तरी माहिती अभेद महाविकास आघाडी आहे.