Washim : शिरसाळा ते शिरसाळा फाटा रस्त्याकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष, रस्त्याची दुरावस्था. रस्त्याने धड चालताही येत नाही.

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/ नारायणराव आरु पाटील   

 

मालेगाव तालुक्यातील शिरसाळा हे गाव तीनही तालुक्याचे मध्यभागी असून मालेगावला जाण्यासाठी २० किलोमीटर, वाशिम जिल्ह्याला जाण्यासाठी जाण्यासाठी २० किलोमीटर, तर रिसोड तालुक्याला जाण्यासाठी २७ किलोमीटरचे अंतर असून या गावासाठी वाशिम (washim) ते रिसोड (risod) राज्यमार्ग क्रमांक ५१ ला जोडून असलेला जोडरस्ता आहे.मोहजारोड फाट्याजवळून शिरसाळा गावापर्यंत असलेला चार किलोमीटरचा रस्ता नव्याने झाला असून त्याचे काम सध्या चालू आहे, परंतु या रस्त्यावर अति पावसामुळे खड्डे पडले असून खड्डे भरण्याकडे संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष आहे.

 

 

 

या रस्त्यावर गिट्टी व मुरूम शिल्लक असून सुद्धा तिथल्या तिथे टाकण्यास ठेकेदारांना वेळ नाही परंतु या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना, शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने या बाबीची गंभीर दखल घेऊन प्रवासासाठी तथा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संबंधित ठेकेदार व संबंधित विभागाचे अभियंता यांनी दखल घेणे गरजेचे आहे हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत वाशिम ते रिसोड राज्यमार्ग क्रमांक ५१ ते खडकीढंगारे अशी मंजूरातच झालेली असून याबाबतची दखल संबंधित विभागाने घ्यावी अशी रास्त मागणी शाळेतील विद्यार्थी तथा या रस्त्यावरून ये- जा करणारे प्रवासी यांनी केली आहे.