वाशीम प्रतिनिधी /नारायणराव पाटील
राजेंद्र आश्रुजी आरु हे वाशिम जिल्ह्यातील रिठद गावातील रहिवासी असून जवळपास २५ वर्षे झाली मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी आपल्या शिक्षकी पेशातून सेवा घडली.अनेक मुलांचे आयुष्य घडवत आले आहेत.कालांतराने २०१२ पासून विदर्भात रिठद गावातील आपल्या जिल्हा परिषदेच्या मराठी केंद्रिय प्राथमिक शाळेत रुजू झाल्यानंतर आजपर्यंत विद्यार्थी घडवण्यासाठी रिठदच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत कायम प्रयत्नशील होते.मध्यतंरी याच शाळेत काही काळ मुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळला.परंतू आपली शिस्त सोडून कोणतेही काम त्यांनी केले नाही व स्विकारले नाही.राजकिय दबावाखाली आयुष्यात कामच केलं नाही.
व ते बळीही पडले नाहीत.त्याचा कडक स्वभावाचे असल्याने न पटलेली मते स्विकारावी नाहीत.त्यामुळे शाळेतील शिस्त व शाळेतील विद्यार्थ्यांना यांचा फायदाच होत गेला व शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.हे विशेष आज दि.३०सष्टे रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय मराठी शाळेच्या माध्यमातून शाळेतील शिक्षणातून सेवानिवृत्तीचा निरोप देण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात येत आहे.दरम्यान कार्यक्रमाचे संचालन ज्ञानबा आरु यांनी केले तर प्रास्ताविक मनोज इंगळे यांनी केले त्यामध्ये शाळेतील शिक्षणावरील आपला विद्यार्थी वर्गात प्रभाव व शिस्त याबाबत विस्तृत माहिती दिली तर भानुदास आरु हनुमान बोरकर, आशाबाई बोरकर यांनी सेवावृत्तीचे विषयावर आपले विचार व्यक्त केले.
तर शाळेतील शिक्षक वृंद व सहकारी आणी राजेंद्र आरु यांचे जावई यांनी त्यांना भेटवस्तू व शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले..या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय बोरकर, उपाध्यक्ष दिपक बोरकर, केंद्र प्रमुख हनुमान बोरकर, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण आरु, माजी मुख्याध्यापक भगवान बोरकर, जेष्ठ शिक्षक भानुदास आरु, दिपक बोडखे, शिरसाट, मुख्याध्यापक मनोज इंगळे संदीप आरु,मदन आरु, बाळकृष्ण बोरकर,मापारी सर,साबळे सर, विजय बोरकर,दिपक भगवान बोरकर,आशाबाई बोरकर,व इतर सर्वच मान्यवर यांनी पुढील आयुष्यासाठी आयुष्य निरोगी राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या..