गंगाधर बोरकर/प्रतिनिधी
नुकत्याच एमपीएससी परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये यश संपादन केल्याबद्दल जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते..त्यामध्ये निवड झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले मदन गजानन सिरसाट, प्रशांत नारायण शेळके व अनिल मदन सिरसाट, (C. A ) यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिजाऊ इंग्लिश स्कुल चे अध्यक्ष माननीय श्री सुभाष बोरकर हे होते तर प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य गजानन आरु हे होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या मदन गजानन शिरसाट यांचा सत्कार सुभाष बोरकर सर यांच्या हस्ते करण्यात आला, तर प्रशांत नारायण शेळके यांचा सत्कार गजानन आरु पंचायत समिती सदस्य रिसोड यांच्या हस्ते करण्यात आला व अनिल मदन शिरसाट सीए यांचा सत्कार राधेश्याम शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रशांत शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना घड्याळाचे बजेट सांगताना वेळेचे महत्व याविषयी माहिती दिली व मदन शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधताना विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन कसे करावे यांचे मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी गजाननराव आरु पंचायत समिती सदस्य यांनी आपल्या भाषणांमधून सर्वांनी आपल्या आयुष्य अभ्यासामध्ये घातलं व यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं,तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा स्वप्न रंगवायचं आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले.
त्याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पलता आरु यांनी केले तर प्रास्ताविक ज्योती काकडे यांनी केले व आभार प्रदर्शन सोनल बंठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गजानन जावळे, भागवत सरनाईक, राहुल खडसे, गोपाल काळे, दिपक थोरात आदीसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.