
नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान मुर्डेश्वर यांच्या चांदीच्या मूर्तीची संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून संत सभागृहात भगवान मुर्डेश्वर यांच्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. सतत सप्ताहभर दररोज सकाळी काकड आरती, हरिनामाची सुरुवात होते. तर सायंकाळी संकीर्तन होतात. यादरम्यान सर्व गावातील घराण्याच्या पंगती दररोज होतात.
याअगोदर सात दिवस आरु परिवारातील लोकांच्या पंगती झाल्या. आणि आठ दिवस बोरकर परिवारातील लोक पंगती करतात. ही परंपरा हजारो वर्षाच्या पूर्वीची असल्याची वयोवृद्ध सांगतात.आज दोन्ही परिवारातील सप्ताहाच्या सांगतेच्या दिवसांची नगरप्रदक्षिणा आहे.भगवान मुर्डेश्वराचा इतिहास आहे.रिठद येथील मुर्डेश्वर मंदिरातील लिंग रामायण काळातील महादेवाचे लिंग असून याचा उल्लेख रामायणात सापडतो.
त्या काळात प्रभू राम हे सीतेला पहात- पहात रिठद येथे आले व येथून परत मुरडले त्यामुळे या ठिकाणाला मुर्डेश्वर असे नाव रिठद या गावचे त्या काळातील नाव सिद्धपूर(रिठद) असे होते.या सप्ताह दरम्यान निघणाऱ्या दिंडीत गावातील आबाल वृद्ध, तरुण, महिला व सर्व भजनी मंडळी उपस्थित होती.या नगरप्रदक्षिणा घालतांना पालखीचा मान कोळी(वाल्मिकी) परिवारातील लोकांनाच परंपरागत आहे.त्यामुळे प्रत्येक वेळी भगवान मुर्डेश्वराची पालखी जेव्हा- जेव्हा काढल्या जाते त्यावेळी कोळी (वाल्मिकी)समाजालाच हा मान आहे.