Washim : बळीराजा पॅनल शी गद्दारी करून विरोधी गटाच्या सानिध्यात स्वार्थासाठी सर्वस्व.मतदाराचा विश्वासघात करून गद्दारी केली मतदारांमध्ये चर्चा.

 

वाशीम जिल्हा प्रतिनिधी/नारायण आरु पाटील

 

वाशिम (washim) जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये वर्षानुवर्ष सध्या स्थितीत असलेल्या विरोधकांच्या ताब्यातून प्रथम निघून गेली त्यावेळच्या सत्ताधारी व आताच्या विरोधी संचालकांना पोटात पोटशूळ उठला. झोप येईना, भ्रष्टाचाराला थारा न देता माजी सभापती संजय शिंदे यांनी भ्रष्टाचाराची दारे बंद केली. या कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचार करणार नाही, होऊ देणार नाही, आणि कुणालाही भ्रष्टाचाराबाबत पुढे येण्यासाठी धजाऊ देणार नाही.

 

 

 

त्यामुळे नेहमी भ्रष्टाचाराच्या कुरणात वावरणारे यांना सभापतीनी लावलेल्या भ्रष्टाचार विरोधी तारेमुळे कुणालाही त्यामध्ये प्रवेश करता आला नाही. म्हणूनच आज बळीराजा पॅनल मधून बाहेर गेलेले व आपल्या पॅनलशी गद्दारी केलेले संचालक भ्रष्टाचाराच्या कुरणामध्ये जाण्यासाठी बळीराजा पॅनल सोडले. ही बाब मतदारांना पचनी पडली नाही. या बळीराजा पॅनलला मतदारांनी मतदान केलं ते मतदार मात्र बळीराजा पॅनल फोडणाऱ्या लोकांना आपल्या नजरेमधून कधीही हटवणार नाहीत. आणि वेळ आल्यावर त्यांना त्यांची जागा दाखवल्या जाईल असे जनतेत बोलल्या जाते.

 

 

 

अगोदर भ्रष्टाचारात बरपटलेल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीला नंबर एक मध्ये आणण्यासाठी राजीनामा दिलेले सभापती संजय शिंदे हे अत्यंत चांगले असल्याने त्यांनी भ्रष्टाचार होऊन दिला व कुणाला करू न दिल्याने या फुटून गेलेल्या लोकांना सहन न झाल्याने त्यांनी घर व दार बदलले आज स्वार्थासाठी पॅनल सोडलेले हे कुणाचे होऊ शकत नाहीत हे या निमित्ताने लोकांच्या लक्षात आले. सध्या स्थितीत तालुका सोडून गेलेले व अज्ञात स्थळी असलेले हे लोक येत्या २४ सप्टेंबर रोजी नवीन सभापतींची निवड असल्याने काय निर्णय घेतात.

 

 

याबाबत जनतेत उत्सुकता आहे. बाजार समितीचा सुरळीत चाललेला संसार या लोकांना पाहावला नाही त्यामुळेच ही क्रिया घडली. आणि उपसभापती असलेले राजू आरु हे आपल्या गावातील सहकार्यासोबत तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी बाहेरगावी गेले होते त्यांनाही कोणते कारण न सांगता व सोबतीला असतांना सुद्धा त्यांच्यावर अविश्वास दाखल केला. त्यामुळे जनतेत कमालीचा रोश निर्माण झाला.परंतू त्यावेळी बळीराजा पॅनलचे प्रमुखांनी या लोकांवर विश्वास दाखवला होता.त्यासाठी आपली पात्रता निर्माण करु शकले नाहीत.