रिठद येथे बैलपोळा सण साजरा ” बैलजोडी व मालकास इनाम वाटप.

 

नारायणराव आरु पाटिल/प्रतिनिधी

 

वर्षानूवर्षे चालत आलेली परंपरा कायम ठेवत यावर्षी सुद्धा रिठद येथे बैलपोळा साजरा करण्यात आला.रिठद येथे पोळा भरवण्याचे ठिकाणी मारोती मंदिर परिसरात हा पोळा भरवण्यात आला. यावेळी परिसरात असलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विलास बोरकर, विश्वनाथ आरू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर बैलांचे लग्न लावण्यासाठी पाच मंगलाष्टके झाली.व नंतर बैलपोळा सण संपन्न झाला.

 

 

यादरम्यान कोणत्याही शेतकऱ्यांने बैल पळवण्याची घाई करू नये यासाठी गावातील गजानन गीरी (गुरुजी) व दिपक गजानन आरु यांनी शेवटपर्यंत जी जोडी राहील त्यासाठी तिनशे,व शंभर रुपये प्रत्येकी इनाम जाहीर केले.त्याप्रमाणे गजानन गीरी यांचे कडून भिकाजी गोडघासे यांचे बैलजोडीचा तिनेशे रु चे बक्षिस गजानन गीरी सर यांचे हस्ते व नारायण आरु, तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव बोरकर यांच्या बक्षीस उपस्थितीत देण्यात आले यावेळी. यावेळी शेतकरी व गावातील मंडळी उपस्थित होती.