धोडप बु. येथे छत्रपती शिवरायांना वंदन व घटनेचा निषेध.

 

 

नारायणराव आरू पाटील, वाशिम/प्रतिनिधी

 

रिसोड तालुक्यातील धोडप बु. येथे छत्रपती शिवरायांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजे शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घटनेचा निषेध करण्यात आला व तसेच यावेळी छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली आहे व यावेळी धोडप बु येथील शेकडो छत्रपती शिवराय प्रेमी व शिवप्रेमी हजर होते, सदर घटना ही अतिशय गंभीर असून यापुढे अशा घटना घडलेल्या नको अशा शिवप्रेमींनी भावना व्यक्त केल्या सदर घटनेस जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ शासनाने कडक कारवाई करावी.

 

 

 

व त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळा तात्काळ बसवा व नवीन पुतळा त्याहीपेक्षा आकर्षक व मजबूत व्हावा अशा शिवप्रेमींनी यावेळी धोडप बुद्रुक येथे व्यक्त केल्या छत्रपती शिवराय एक महाराष्ट्रातील नव्हे तर देशाची अस्मिता आहे त्यामुळे ह्या अस्मिता आपण जपल्या पाहिजे त्या दृष्टीने सदर घटना यापुढे कुठेही घडता कामा नये असे झाल्यास यानंतर आम्ही गप्प बसणार नाही असा सज्जड दम यावेळी शिवप्रेमींनी देत या घटनेचा निषेध केला व शेवटी छत्रपती शिवरायांना मानवंदना करून कार्यक्रमाचा समारोप केला. प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील