washim : वाशिम येथे श्री बाळासाहेब यांच्या यात्रेनिमित्त शंकर पटाचे आयोजन

 

 

washim

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील

 

 

 

washim : वाशिम येथे श्री बाळासाहेब यांच्या यात्रेनिमित्त ‘शंकरपट’ (बैलगाडा शर्यत)कार्यक्रमाचे आज दिनांक १८/१०/२०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे राब-राब राबणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोरंजन व थोडासा शेतीपासून शरीराला आणि मनाला दिलासा मिळावा व आपल्या सर्जा- राजाच्या ताकतीचे दर्शन व्हावे व त्याने आपले नाव कमवावे व त्यातून शेतकऱ्याला जगण्याची उमेद मिळावी या या हेतूनेच या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भाऊ मापारी अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद वाशिम तसेच युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मडके, इतर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे या कार्यक्रमास्थळी आगमन होतांना फेटे बांधून वाजत- गाजत स्वागत करण्यात आले.