वाशीम : वाशीमच्या सामान्य रुग्णालयाने कात टाकली

 

वाशीम

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील

 

 

 

वाशीम : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिलजी कावरखे, सर्व प्रथम आपले अभिनंदन. तीन वर्षांपूर्वी जेव्हा जिल्हा ‘सामान्य रुग्णालयात’ ये-जा होती त्यावेळी दुर्गंधीने नाकावर रुमाल बांधावा लागत असे. कोणत्याही रूग्णांना विचारले काम झालं का? तर हताशपणे आपली नकारार्थी मान डोलवत होती. आजच्या घडीला याच सामान्य रूग्णालयाने विकास आणि सेवा यांची कात टाकली आहे.

 

 

 

हा चमत्कार आपल्या काम करण्याची पद्धतीमुळेच हे शक्य झाले.आपण जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रुजू झालात आणि लोखंडाला परिस स्पर्श होताच त्याचे सोनं व्हावं ! असा हा प्रकार होता.आपली जिवतोड मेहनत सहकारी मित्रांना विश्वासात घेणे याचा परिणाम म्हणून आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला राज्यांतून प्रथम क्रमांक मिळाला.आता देशपातळीवर आपण आणि आपली चमू अशीच कामगिरी करेल यात शंका नाही. यासाठी जनतेकडून खरंच मनापासून अभिनंदनास पात्र कामगीरी केली.असाच खेळ जनतेसाठी चालत राहावा हिच सामान्य नागरिकांची अपेक्षा.