वाशीम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
washim : वाशिम तालुक्यातील जुमडा jumda येथे १० ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व लसीकरण कार्यक्रमांतर्गत बीसीजी लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण यशस्वी करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी, ओबीसी सेलचे वाशिम तालुकाध्यक्ष अमोल शिंदे amol shinde यांनी मोलाचे सहकार्य करून, जास्तीत जास्त पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी मार्गदर्शन केले. त्यामुळे या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य विभागांतर्गत सध्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात ‘लसीकरण’ मोहिम राबविली जात आहे.
मात्र, सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम असल्यामुळे नागरिक गावात राहत नाहीत. त्यामुळे जनजागृतीद्वारे नागरिकांना माहिती देवून लसीकरणासाठी मार्गदर्शनाची गरज पडत आहे. ही बाब पाहता १० ऑक्टोबर रोजी जुमडा jumda येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व लसीकरण कार्यक्रमांतर्गत बीसीजी लसीकरण करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविका सविता कुटे, आर. बी. गोटे, आरती भिसे, महेश घुगे, आशा स्वयंसेविका सिंधूबाई पडघान, मदतनीस विमल शिंदे यांच्या पथकाने गावातील पात्र व्यक्तींचे लसीकरण केले. यावेळी गावातील हरिभाऊ शिंदे, मधुकर शिंदे, सुभाष पडघान, अमोल शिंदे आदींची उपस्थिती होती.
सोयाबीन सोंगणीचा लसीकरणात अडथळा
सध्या ग्रामीण भागात सोयाबीन सोंगणीची कामे झपाट्याने सुरू आहेत. त्यामुळे सकाळी ६ वाजतापासूनच लोक शेतात कामावर जात आहेत. ही बाब पाहता बीसीजी लसीकरणासाठी गावात नागरिकच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ग्रामस्तरावर जनजागृती करून, पात्र नागरिकांना बीसीजी लसीकरणासाठी मार्गदर्शनाची गरज झाली आहे. ही बाब पाहता जुमडा येथे अमोल शिंदे यांनी मोलाचे सहकार्य करून बीसीजी लसीकरण यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाला मदत केली.