
वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
washim : स्थानिक रिसोड risod येथील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथे 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी दैदिप्यमान पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षा आदरणीय प्राचार्या मंजुषा सु. देशमुख ह्या होत्या. व प्रमुख उपस्थितीत पर्यवेक्षक विलासराव देशमुख हे असून. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दोन्ही महापुरुषाच्या प्रतिमेचे मालार्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.
व मनोगतातून महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला त्याचप्रमाणे शिक्षक, शिक्षिका यांनी सुद्धा राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे विचार आणि कार्य आजही प्रेरणादायी कसे आहे.याबाबत आपल्या विचारातून व मनोगतातून विचार व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्या मंजुषा सु.देशमुख मॅडम यांनी अहिंसेचे पुजारी, समता दूत, सहिष्णुतेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची अहिंसा आजच्या काळात किती महत्त्वाची आहे याविषयी आपले मत प्रगट केले. त्याचप्रमाणे भारताचे माजी दैदिप्यमान पंतप्रधान लालबहादूर शास्त्री “जय जवान जय किसान” देशाचा जवान आणि शेतकरी सुखी तर जग सुखी. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.
तरी त्याला आज आत्महत्या करण्याची वेळ येत आहे ही आज भारत देशामध्ये शोकांतिका आहे.त्या काळातील लाल बहादूर शास्त्री यांचे विचार आजही कसे अजरामर आहेत याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी.एच. मोरे सर यांनी केले . तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका मंगला शेटे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला प्राथमिक ,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक च्या विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.