Washim : बोराळा येथील सरपंचाची दान वृत्ती,स्वखर्चातून केली अंपगाला मदत.

 

 

नारायण आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी

 

 

मालेगाव तालुक्यातील बोराळा जहांगीरच्या सरपंच सौ.पुष्पा गजानन जटाळे यांनी आपल्या स्वखर्चातून बोराळा जहागीर गावातील वृद्ध,अपंग वासुदेव नारायण जटाळे या व्यक्तीला चालता येत नसल्याने त्या वृद्धांची गरज पाहता मदतीचा हात म्हणून सरपंच यांनी मदत केली.तसेच पती गजानन जटाळे यांनी पत्नी पुष्पा हिचे जनहिताचे कार्यास हातभार लाऊन जनसेवेप्रती कर्तव्यास प्रोत्साहन देण्यासाठी परावृत्त केले.

 

 

या पदावर असतांनाच आपणा सर्वांवर जनतेचे ऋण असतेच त्याची उतराई म्हणून त्यासाठीच अशा गरजवंताला सहकार्य करावे लागते असा मोलाचा संदेश देतांना सरपंचा पुष्पा गजानन जटाळे बोलत होत्या.