वाशिम जिल्हा प्रतिनिधी /नारायणराव आरू पाटील
वाशिम जिल्हातील,(washim) मालेगाव रिसोड विधानसभा निवडणुकीसाठी, इच्छुक उमेदवाराची गर्दी वाढायला लागली आहे, आणि पक्षश्रेष्ठी कोणाला तिकीट देते, यावर मतदारांचा लक्ष लागून आहे.विधानसभेचा बिगुल वाजायला काही दिवसच आता शिल्लक राहिलेले आहे विधानसभेची तारीख अजून घोषित झालेली नसली तरी मात्र इच्छुकाची भाऊ गर्दी जमा झालेली आहे . अनेक युवक तसेच जस्ट विधानसभेसा साठी इच्छुक म्हणून कामाला लागले आहे त्यानुसार आतापासून निवडणुकीची रंगत दिसून येत आहे.
तिकीट वाटपाचे फार्मूले अजून कोणत्याही राजकीय पक्षाकडून ठरलेले नसले तरी मात्र उमेदवारी आपलीच म्हणून अनेक जण कामाला लागलेले आहेत. विधानसभेच्या इच्छुक भाऊ गर्दीमध्ये मात्र, यामध्ये मालेगाव रिसोड (malegaon) विधानसभेचे विद्यमान आमदार अमित दादा झनक, यांची उमेदवारी मात्र निश्चित आहे. महाविकास आघाडी कडून त्यांची उमेदवारी मात्र निश्चित आहे. ते निवडणूक मध्ये उतरणार आहे. त्यांच्याकडे निवडणुकीचा आणि काम करण्याचा चांगलाच अनुभव आहे.
त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात बाकीच्या पक्षाने कोणी उतरवले तरी स्पर्धा मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार अमित दादा यांच्या सोबतच आहे.शिवसेना शिंदे गटाकडून विदर्भ कन्या भावनाताई गवळी अजिंक्य खासदार, तसेच आत्ताच विधान परिषदेवर आमदार म्हणून त्यांना निवडून दिलेले आहे, त्या सुद्धा मालेगाव रिसोड (risod) विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते, तशा प्रकारची तयारी त्यांची दिसून येत आहे, महायुतीच्या जागा वाटपाकडे बघता, मालेगाव विधानसभेची जागा ही शिवसेना शिंदे गटाकडे यावी यासाठी भावनाताई प्रयत्नशील आहेत.
तसेच भाजपा मालेगाव रिसोड विधानसभा (vidhansabha) प्रमुख, एडवोकेट नकुल दादा देशमुख, यांची भाजपा च्या उमेदवारीवर निवडणूक लढण्याची तयारी ही युद्धपातळीवर सुरू असून, ते सुद्धा रिसोड मालेगाव विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते, व तसेच भारतीय जनता पार्टीचे अत्यंत जुने व संघ परिवाराचे अत्यंत गणित समान असलेले माजी आमदार एडवोकेट विजयराव जाधव हे सुद्धा मालेगाव रिसोड विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी तशा प्रकारची तयारी आणि मतदाराच्या समस्या व भेटीगाठी तसेच सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी देण्यामध्ये त्यांचा भर दिसून येत आहे, ते सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
वंचित बहुजन आघाडी कडून इच्छुक असलेले व तसेच तिकीट त्यांनाच मिळणार अशी जनतेमधून चर्चा आहे, तशा प्रकारचे कार्य सुद्धा त्यांनी बऱ्याच दिवसाच्या अगोदरपासून या विधानसभेमध्ये सुरू केलेले आहे. ते म्हणतात माझ्या सगळ्या सोयऱ्यांचा हा मतदार संघ आहे, ते म्हणजे, प्रा.प्रशांत पाटील गोळे हे सुद्धा आहे मालेगाव रिसोड विधानसभा निवडणूक लढवणारच, व तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, शेतकऱ्याचे कैवारी, ज्यांनी आत्तापर्यंत रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त वेळ दिला शेतकऱ्यांना विमा मंजूर करून दिला, कित्येक उपोषणे आंदोलने, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी व, महिलांसाठी केले, ते दामू अण्णा इंगोले सुद्धा, मालेगाव रिसोड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून त्यांचा तिकीट निश्चित समजण्यात येत आहे.मालेगाव रिसोड विधानसभा निवडणूक मध्ये कोणता पक्ष कोणाला तिकीट देतो याकडेमतदाराचे मात्र लक्ष लागून आहे, निवडणुकीच्या गप्पा गावागावात पारावर, मोबाईलवर मात्र रंगतच चाललेले आहेत.