नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी
सेवा निवृत्त शिक्षकांचा सत्कार, विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.वाशिम जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, वाशिम (र.नं. ३०१) यांच्या वतीने रविवार, १८ ऑगस्ट २०२४ रोजी जैन भवन, अकोला नाका येथे सेवा निवृत्त शिक्षकांचा सपत्नीक सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ना. प्रतापरावजी जाधव, केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. खा. श्री. संजय देशमुख, खासदार वाशिम-यवतमाळ, तर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. अमितभाऊ झनक, आमदार रिसोड-मालेगाव, यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार अमितभाऊ झनक यांनी पतसंस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. पतसंस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, पारदर्शक कारभारामुळे संस्था यशस्वी मार्गक्रमण करीत पुढे जात आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी, मा. अध्यक्ष आणि मा. उद्घाटक यांच्या हस्ते वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले: https://www.washimzptps.com
कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रतापरावजी जाधव यांनी पतसंस्थेच्या अहवालाचे सूक्ष्म निरीक्षण करत,संस्थेने राबविलेल्या सर्व उपक्रमांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी विशेषतः इतर पतसंस्था बुडत असताना शिक्षक सहकारी वाशिम पतसंस्थेने ११.२५% इतका मोठा लाभांश सभासदांना दिल्याबद्दल आणि आदर्श कार्यपद्धतीबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांनी शिक्षकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचे देखील कौतुक केले.
खासदार संजयबापू देशमुख यांनीही पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करत, संस्थेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन केले. संस्थेने शिक्षक सभासदांच्या हितासाठी घेतलेले निर्णय प्रशंसनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.आमदार किरणराव सरनाईक यांनी शिक्षकांच्या समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्याकडे केली. त्यांनी पतसंस्थेच्या विविध उपक्रमांचे आणि योजनेचे कौतुक केले व संस्थेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात २०२३-२०२४ या कालावधीत सेवेतून निवृत्त झालेल्या शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ना. प्रतापरावजी जाधव, केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री- *प्रमुख अतिथी* मा. खा. श्री. संजय देशमुख, खासदार वाशिम- यवतमाळ *उद्घाटक* मा. श्री. अमितभाऊ झनक, आमदार रिसोड-मालेगाव *विशेष अतिथी* मा.. श्री. किरणराव सरनाईक, आमदार शिक्षक मतदारसंघ, अमरावती विभाग; मा.शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे ; मा.श्री. चक्रधरभाऊ गोटे, उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती, जि.प. वाशिम , मा.
श्री. सुरेशभाऊ मापारी अर्थ व बांधकाम सभापती जि.प. वाशिम मा.श्री. सुधिर कव्हर जि.प.सदस्य तथा जिल्हा प्रमुख शिवसेना,मा. विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र संघटना, मा.श्री. विनोदराब पट्टेबहादुर जि.प.सदस्य वाशिम मा. श्री. दिलीपराव देशमुख जि.प. सदस्य वाशिम मा. सौ. सुजाता अरुण जाधव सभापती, पं. स. मानोरा, मा. श्री दामुअण्णा गोटे संचालक, कृ.उ.बा.स. वाशिम मा.श्री. बालाजी वानखडे सभापती, पं. स. वाशिम ,मा. श्री संजुभाऊ शिंदे सभापती, कृ.उ.बा.स. रिसोड मा. मा. श्री मधुकरमामा काळे सभापती, पं. स. मालेगांव, मा. श्री. सरकार इंगोले महामंत्री पीरिपा, वाशिम ,मा. श्री डॉ. भगवानराव गोटे,मा.जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस,मा. श्री. तेजराब बानखडे जिल्हाध्यक्ष रिपाई (आठवले गट) ,मा.श्री. राजुभाऊ चौधरी,संचालक कृ.उ.बा. स. वाशिम ,मा. श्री. गजाननराव आरु सदस्य पंचायत समिती रिसोड
मा. श्री. नंदकिशोर भोयर संचालक कृ.उ.बा.स.वाशिम,मा. संजयभाऊ आधारवडे सामाजिक कार्यकर्ते,मा. श्री. सुभाषराव चौधरी संचालक कृ.उ.बा.स.वाशिम मा. श्री. राजुभाऊ आरु ,उपसभापती कृ.उ.बा.स. रिसोड,श्री. गोपाळराव आटोटे महा प्रदेशाध्यक्ष पि. री. पा. मा. श्री हनुमानजी बोरकरकें द्रप्रमुख जेष्ठ नेते, महा. प्रदेश राष्ट्रवादी,मा.श्री. प्रशांत बिजवे प्रदेश उपाध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटना, जिल्हा वाशिम, मा. श्री. सुभाषदादा जांभरुणकर नेते अखिल भारतीय शिक्षक संघ या कार्यक्रमाला मोठे संख्येने सेवानिवृत्त शिक्षक गुणवंत पाल्य व शिक्षक सभासदांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमानंतर *वार्षिक सर्वसाधारण सभा* घेण्यात आली. पतसंस्थेचे व्यवस्थापक शंकर घुले यांनी अहवाल वाचन केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले. सभासदांच्या आकस्मित मृत्यू झाल्यास देणाऱ्या मदतीमध्ये यावर्षी पाच लाख वाढ देण्याची घोषणा करण्यात आली, दुर्धर आजाराने त्रस्त सभासदांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये वाढ करून ही मदत 5000 वरून 25000 करण्यात आली, सभेचे अध्यक्ष व पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तराव इढोळे यांनी एक ते सतरा ठराव मांडले, त्यापैकी पंधरा क्रमांकाचा ठराव सभासदांच्या ठेवी पोटी नियामक मंडळाकडे एकूण ठेवीच्या ०.१०% अंशदान जमा करणे बाबतचा नुकसानदायक ठराव नामंजूर करण्यात आला, तर *इतर सर्व ठराव आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आले.* राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.
विरोधकांनी चालवलेल्या चुकीच्या भूलथापांना कोणतेही सुज्ञ सभासद बळी न पडता त्यांनी पतसंस्थेच्या विकासासाठी दाखविलेली व पतसंस्थेच्या संचालक मंडळावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत भक्कम पाठिंबा दाखल्याबद्दल व संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळांनी सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले. अनेक सभासदांनी संचालक मंडळ करीत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून व संस्थेत होत असलेल्या सकारात्मक बदलाबाबत समाधान व्यक्त केले.
विरोधकांनी कितीही उठसूट आरोप केले तरी जे सत्य आहे ते आपल्या समोर दिसत आहे व पारदर्शकपणे चालू असलेल्या कारभारावर विरोधकांनी विरोधासाठी विरोध चालविला असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले. प्रश्नोत्तरामध्ये विरोधकांनी मुद्दामहून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला परंतु सभासदांनी तो फेटाळल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले. उपस्थिती रजिस्टर वर/ इतिवृत्त रजिस्टरवर सह्या करताना काही विरोधकांनी मुद्दामहून उपस्थिती सह्या रजिस्टरवर आडव्या रेषां मारून इतिवृत्त रजिस्टर फाडण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परंतु विरोधकांनी केलेला प्रयत्न विरोधकांना काही छातीला लागल्याने आता ते चुकीचा प्रचार करण्याच्या मागे लागले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वाझुळकर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष खोडे सर आणि गजानन शेळके सर यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष विजय मनवर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य व संस्थेचे संचालक जगन्नाथ आरू, रा.सू. इंगळे ,प्रशांत वाझुळकर,संध्या बांडे अढाऊ, सुजाता कटके तज्ञ संचालक किशोर जुनघरे , पुरुषोत्तम तायडे व संस्थेचे व्यवस्थापक शंकर घुले व सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले व सभा शांततेत पार पडली.