वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील
रिसोड तालुक्यातील बेलखेडा ते हिवरापेन (hivrapen) रस्त्याच्या दरम्यान बेलखेडा गावाच्या दरबी नाल्याजवळ ज्ञानबा घोडे यांचे शेतातील गोठ्यासमोर मुख्य डांबरी रस्त्यावर एक ते दीड फुटाचा खड्डा पडला असून येथे कोणत्याही वजनाचे मालवाहू वाहन पलटी होऊ शकते त्यामुळे तेथे मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करणे गरजेचे आहे. नाहीतर कोणत्या क्षणी मालवाहू वाहनाचा अपघात होऊन वाहन पलटी होऊ शकते व त्यामध्ये कोणाचीही जीवित हानी सुद्धा होईल हे सांगता येत नाही.
त्यासाठी वेळेस दखल घेऊन कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग रिसोड यांनी दखल घ्यावी व खड्डा पडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी. हिवरापेन येथील गावातील मंचकराव सरनाईक, पांडुरंग सरनाईक, कैलास सरनाईक, गोविंदराव सरनाईक, गणेशराव सरनाईक, जानराव सरनाईक, हिम्मतराव सरनाईक, संजाबराव सरनाईक इत्यादी गावकरी मंडळींनी बेलखेडा ते हिवरा पेन रस्त्यावर (ज्ञानबा घोडे यांचे शेताजवळ गोठ्याजवळ) मोठा खड्डा पडला त्याची दुरुस्ती करावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.