नारायण आरु पाटील / प्रतिनिधी
मनोकामना पूर्ण करणारा पार्डी तिखे येथील भालचंद्र गणपती ! पारडीचा pardi भालचंद्र गणपती, 300 वर्षांपूर्वी स्थापित गणेश मूर्ती. रिसोड risod तालुक्यातील आसेगाव पेन इथून उत्तरेस चार किलोमीटर अंतरावर वसलेल्या पारडी गावाला गणपतीची पारडी असेही संबोधले जाते, तीनशे वर्षांपूर्वी स्थापित गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असून या ठिकाणी मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची दुढ श्रद्धा आहे.
मंदिरात राहणारे व व्यवस्था ठेवणारे ‘संदीप श्रीराम देशपांडे’ यांनी दिलेल्या माहितीनुसार पारडी गावात पूर्वी फार मोठी गढी होती, देशपांडे परिवार या गडीवर वास्तव्याला होता शेजारी दीड एकराचा बगीचा आणि त्यांच्या मध्यभागी गणपतीचे सुबक मंदिर होते मंदिराजवळ एक विहीर असून मंदिर परिसरात कुपनलिका खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संकटी चतुर्थीला भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. “भक्तीला शक्तीचे हमखास बळ मिळत असल्याने” पार्डीच्या गणपती बाप्पाची कीर्ती महान म्हणून पंचक्रोशीत नव्हे तर विदर्भ,मराठवाड्यात नावलौकिक आहे.गणेशोत्सव काळात मंदिरामध्ये दहा दिवसांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.