washim : रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आक्रमक

washim

 

नारायणराव आरु पाटील / प्रतिनिधी 

 

रिसोड risod तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे uddhav babalasaheb thakre पक्षाचे पदाधिकारी आक्रमक रिठद ता.१३  रिसोड तालुक्यातील शेतकरी आधीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून गडगडलेले शेतमालाचे बाजार भाव, वाढलेला प्रचंड उत्पादन खर्च, यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस आलेला आहे. अशातच शासनाकडून काही तुटपुंज्या स्वरूपाच्या मदती दिल्या जात आहेत.

 

 

 

परंतु त्या मदती मिळवण्यासाठी प्रचंड जाचक अटी घालून दिल्या जात आहेत यामध्ये शेतकऱ्याची प्रचंड घालमेल होत आहे शेतातील कामे करावी की मदतीसाठी घातलेल्या जाचक अटी पूर्ण कराव्या या विवंचनेत संपूर्ण शेतकरी सापडलेला आहे. कृषी विभागाकडून मिळणारी मदत त्यामधील सामायिक क्षेत्रात नावे असलेल्या शेतकऱ्यांना नव्यानेच प्रतिज्ञालेख/सम्मतीलेख मागवला जात आहेत. त्या सर्व सामायिक खातेदारांना प्रत्यक्ष तहसीलवर हजर राहण्यासाठी वेळोवेळी चकरा माराव्या लागत आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र,उत्पन्नाचे दाखले सुद्धा मिळविताना विद्यार्थी व पालकांचे प्रचंड हाल होत आहेत.

 

 

 

ही बाब अत्यंत गंभीर असून सदर बाबीची दखल घेऊन ‘रिसोड’ risod तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांनी चक्क तहसील कार्यालयात कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्याशी सामूहिक चर्चा करून निवेदन दिले चर्चेमध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळविताना तात्काळत ठेवू नये अशी भूमिका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. चंद्रशेखर देशमुख यांनी मांडली व शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता सहकार्याची भूमिका ठेवावी अशी सूचना रिसोड विधानसभेचे सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप यांनी मांडली.

 

 

 

तसेच इतरही अडचणी सोडवण्यासाठी तहसील प्रशासन व कृषी विभाग यांनी दिरंगाई करू नये अन्यथा शिवसेनेला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल अशा आशयाचे निवेदन सुद्धा यावेळी देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण आरु, तालुका समन्वयक घनश्याम मापारी, युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश देशमुख, युवासेना तालुकाप्रमुख गजानन सानप, उपतालुकाप्रमुख समाधान काठोळे, प्रसिद्धीप्रमुख दिपक मापारी, किसन कळासरे, दुर्गादास मोरे, विलासराव वाघ, प्रकाशराव देशमुख,शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.