Washim : हमी भावापेक्षा सोयाबीन कमी भावात घेतल्यास गाठ संभाजी ब्रिगेड सोबत -गोपाल पाटील खडसे..!!! भूमिपुत्र शेतकऱ्यांसाठी निवेदनाची दखल घेणार का..?..!!! खरी कसरत आता .!!

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी /नारायणराव आरू पाटील

 

सोयाबीनच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन शेतकरी, राजकीय, सामाजिक पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सध्या बाजारात शेतकरी सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. अशा स्थितीत शासनाने सोयाबीनचे किमान समर्थन मूल्य ४८९२/ रुपये एवढे निर्धारित केले असतांना कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर खाजगी बाजारामध्ये शेतकऱ्यांची सोयाबीन निर्धारित समर्थन मूल्यांपेक्षा कमी दरात खरेदी केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या मजबुरीचा व अगतिकतेचा गैर फायदा घेतला जात आहे.या विरोधात व अन्य मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे.

 

 

विविध राजकीय व सामाजिक संघटना आणी सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे.एकीकडे सर्वच गोष्टीसाठी महागाई प्रचंड वाढलेली असतांना सोयाबीनचे यावर्षी उत्पादन कमी झाले. त्यातच शासनाने निर्धारित केलेला दर सुद्धा अत्यल्प आहे, अशातच व्यापारी पुन्हा कमी दराने खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करत आहेत.अशा व्यापाऱ्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करून त्यांचे परवाना रद्द करावेत. सध्या ढगाळ वातावरण आहे त्यामुळे थोडा ओलसरपणा राहणारच. व्यापाऱ्यांच्या पोत्यांनी ओट्यावर निर्धारित जागे पेक्षा जास्त जागा व्यापली आहे. सदर जागा सुध्दा रिकामी करावी

 

 

अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल..!!

 

असा इशारा संभाजी ब्रिगेडचे वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार रिसोड, सहाय्यक निबंधक रिसोड व सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड यांना दिले आहे.संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांचे मार्गदर्शनाखाली निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे, जिल्हा सचिव शेख इसाक परवेझ, श्रीकृष्ण शिंदे, विकास देशमुख,राधेश्याम शिरसाट, रिसोड तालुकाध्यक्ष गोपाल खडसे गजानन खंदारे आदींच्या सह्या आहेत.

 

 

 

सगळीकडेच महागाई वाढलेली असतांना व्यापाऱ्यांना सोयाबीन खरेदी करणे परवडत नसेल तर त्यांनी खरेदी करू नये. मात्र मुद्दाहून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते सोबतच व्यापारी स्वतः चा ओट्यावर माल ठेवून व्यापारी शेतकऱ्यांचा शेतमाल रस्त्यात बेवारस टाकतात अशी पोती शेतकऱ्यांच्या ताब्यात देऊन त्याची हर्राशी करणार ? या विरोधात संभाजी ब्रिगेड जिल्हाभर एकाच वेळी तीव्र आंदोलन करणार आहे या आंदोलनात सर्वांनीच मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजेत व आपली एकजूट दाखवली पाहिजेत असे जिल्हा महासचिव संभाजी ब्रिगेड वाशिमचे शेख इसाक परवेज यांनी बोलतांना आपले मत व्यक्त केले.

 

 

 

शेतकऱ्याची सर्व क्षेत्रातून अडवणूक होत आहे याचे कारण म्हणजे शेतकरी संघटित नाही व राजकारणी लोक त्यांचा फक्त वापर करून घेतात त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच पैशाची अडचण असते. त्यामुळे आपल्या हक्कासाठी शेतकऱ्यांनी संघटित झालं पाहिजे तो आपल्या अधिकाराच्या मागण्या पदरात पडून घेतल्या पाहिजेत असे यावेळी कोयाळी भिसडे येथील शेतकरी संतोष भिसडे यांनी बोलतांना आपले मत व्यक्त केले.