t20 world cup latest news : भारतीय संघाने टी-२० विश्वचषक t20 world cup स्पर्धेत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश करताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी नमवले, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताने २० षटकांत ५ बाद २०५ धावा उभारल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ७ बाद १८१ धावांवर रोखत भारताने दिमाखदार विजय मिळवला. स्फोटक अर्धशतक झळकावणारा कर्णधार रोहित शर्मा सामनावीर ठरला. आता भारत २७ जूनला गयाना येथे दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळेल.
भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅविस हेड पुन्हा एकदा भारतीयांसाठी डोकेदुखी ठरला. त्याने ४३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. तो खेळत असेपर्यंत कांगारू विजयी मार्गावर होते. मात्र, १७व्या षटकात जसप्रीत बुमराहने त्याला झेल बाद करत सामना भारताच्या बाजूने झुकविला. कर्णधार मिचेल मार्शने २८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३७, तर ग्लेन मॅक्सवेलने १२ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह २० धावा केल्या. अर्शदीप सिंगने ३ तर कुलदीप यादवने २ बळी घेतले. त्याआधी, कर्णधार रोहित शर्माने ४१ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह ९२ धावांचा जबरदस्त तडाखा दिला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याच षटकात विराट कोहलीचा बहुमूल्य बळी मिळवला, मात्र यानंतर रोहितने कांगारूंवर विशेषतः मिचेल स्टार्कवर जबरदस्त हल्ला चढवला.
त्याच्या एका षटकात रोहितने चार षटकार आणि एक चौकार मारत भारताच्या धावगतीला कमालीचा वेग दिला. रोहितने केवळ १९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे, संघाच्या ५२ धावांपैकी ५० धावा एकट्या रोहितने केल्या होत्या. रोहितने ऋषभ पंतसोबत दुसऱ्या गड्यासाठी ३८ चेंडूत ८७ धावांची भागीदारी केली. यापैकी ७० धावा रोहितने चोपल्या. आठव्या षटकात मार्कस स्टोइनिसने पंतला बाद केल्यानंतर रोहितने सूर्यकुमार यादवसोबत २० चेंडूंत ३४ धावांची भागीदारी केली. शतकापासून ८ धावा दूर असताना रोहित बाद झाला. सूर्यकुमारने १६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या. शिवम दुबेने २८, तर हार्दिक पांड्याने नाबाद २७ धावा केल्या. मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
भारताने टी-२० विश्वचषकात सर्वाधिक ३४ सामने जिंकण्याचा पराक्रम केला.
विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सातव्यांदा शून्यावर बाद झाला.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २०० षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला फलंदाज ठरला.
‘रोहित शर्माने’ यंदाच्या टी-२० विश्वचषकातील सर्वात वेगवान १९ चेंडूत अर्धशतक ठोकले.
रोहित शर्माने टी-२० विश्वचषकात भारताकडून तिसरे वेगवान अर्धशतक झळकावले. याआधी, युवराज सिंगने १२ चेंडूत (२००७), लोकेश राहुलने १८ चेंडूंत (२०२१) अर्धशतक झळकावले आहे.
टी-२० विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक ७ षटकारांचा युवराज सिंगचा भारतीय विक्रम मोडताना रोहित शर्माने ८ षटकारांचा नवा विक्रम नोंदवला.
रोहित शर्माने t20 विश्वचषकातील भारताकडून दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. त्याला सुरेश रैनाचा (१०१) विक्रम मोडण्यात थोडक्यात अपयश आले.
रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणारा कर्णधार ठरला, २०१० साली वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने भारताविरुद्धच ९८ धावांची खेळी केली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शमनि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३२ षटकार मारले. यासह त्याने एका संघाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा खिस गेलचा (१३०, इंग्लंडविरुद्ध) विश्वविक्रम मोडला.
भारत : रोहित शर्मा त्रि. गो. विश्वचषकातील भारताकडून दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली. त्याला सुरेश रैनाचा (१०१) विक्रम मोडण्यात थोडक्यात अपयश आले.
रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणारा कर्णधार ठरला, २०१० साली वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने भारताविरुद्धच ९८ धावांची खेळी केली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शमनि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३२ षटकार मारले. यासह त्याने एका संघाविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा खिस गेलचा (१३०, इंग्लंडविरुद्ध) विश्वविक्रम मोडला.
सामनावीर रोहित शर्मा
स्टार्क ९२, विराट कोहली डो. डेव्हिड गो. हेझलवूड ०. ऋषभ पंत झे. हेङ्गालवूह गो. स्टोडनिस १५, सूर्यकुमार यादव झे. वेड गो. स्टार्क ३१. शिवम दुबे झे. वॉर्नर गो. स्टोडनिस २५. हार्दिक पांड्या नाबाद २७. रवींद जडेजा नाबाद ९. अवांतर ३. एकूण : २० षटकांत ५ बाद २०५ धावा. बाद क्रम : १-६, २-१३, ३ १२७, ४-१५९, ५-१९४. गोलंदाजी मिचेल स्टार्क ४-०-४५-२: जोश हेझलवूड ४-०-१४-१: पॅट कमिन्स ४-०-४८-०; अॅडम झम्पा ४-०-४१ ०: मार्कस स्टोइनिस ४-०-५६-२
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर झे. सूर्यकुमार गो. अर्शदीप ६, ट्रॅविस हेड झे. रोहित गो. बुमराह ७६, मिचेल मार्श झे. अक्षर गो. कुलदीप ३७, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. कुलदीप २०, मार्कस स्टोइनिस झे. हार्दिक गो. अक्षर २, टिम डेव्हिड झे. बुमराह गो. अर्शदीप १५, मॅथ्यू वेड झे. कुलदीप गो. अर्शदीप १, पेंट कमिन्स नाबाद ११, मिचेल स्टार्क नाबाद ४. अवांतर ९. एकूण: २० षटकांत ७ बाद १८१ धावा. बाद क्रम : १- ६, २-८७, ३-१२८, ४-१३५, ५-१५०, ६-१५३, ७-१६६. गोलंदाजी: अर्शदीप सिंग ४-०-३७-३: जसप्रीत बुमराह ४-०-२९-१: अक्षर पटेल ३-०-२१-१: हार्दिक पांड्या ४- ०-४७-०: कुलदीप यादव ४-०-२४-२: रवींद्र जडेजा १-०-१७-०