चिखली (बुलढाणा)|१२ एप्रिल २०२६
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील सुपुत्र आणि पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनिल अंभोरे यांना राज्यस्तरीय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सध्या या सन्मानामुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरातून त्यांच्या कार्याचे जोरदार कौतुक होत आहे.
तथागत बहुउद्देशीय संस्था मेहकर, जीवनदीप अनाथ आश्रम व वृद्धाश्रम, राजमाता जिजाऊ स्वयं सहायता महिला बचत गट आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.
पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सुनिल अंभोरे यांनी अनेक उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्याची यापूर्वीही अनेक वेळा दखल घेण्यात आली आहे.
याआधी त्यांना ‘मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट’ कडून सन्मानपत्र, ‘विश्वशांती समाज गौरव’ पुरस्कार, ‘उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार, ‘राष्ट्रीय माणुसकी सेवा गौरव’ आणि ‘जीवनगौरव’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
यंदाच्या वर्षातील हा पहिलाच मोठा राज्यस्तरीय ‘समाज भूषण’ पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून, विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे असून, समाजासाठी केलेल्या त्यांच्या योगदानाचा हा सन्मान मानला जात आहे.
👉 Related News
- जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर दोघी बहिणींची सरकारी नोकरीत निवड
- देऊळगावराजा हादरला! दगडवाडीत मध्यरात्री भीषण आग, गॅस सिलेंडर स्फोटात 7 जखमी; लाखोंचे नुकसान
- देऊळगाव राजात धक्कादायक घटना! वॉटरपार्कमध्ये २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; सुरक्षेवर गंभीर प्रश्न
👉 हे आवश्यक करा :
अशाच महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या आणि ही बातमी शेअर करा.










