Sambhaji nagar : तरुणाने तरुणीचा पाठलाग करून रस्त्यात अडवून बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा करताच आसपासच्या लोकांनी धाव घेतली. त्यानंतर पोलिसही आल्याचे पाहून तरुणाने खिशातून चाकू काढून स्वतःचा गळा कापला. शनिवारी रात्री १० वाजता ‘चिश्तिया चौक’ chistiya chowk परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
मुजम्मिल आरिफ खान mujmmil aarif khan (वय २८) असे जखमी तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १० वाजता तरुणी एमजीएमच्या MGM दिशेने पायी जात होती. मुजम्मिल mujmmil तिचा पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न करत होता. काही अंतरावर त्याने तिचा हात पकडून बोलण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिने आरडाओरडा केला. आजूबाजूच्यांनी धाव घेऊन मुजम्मिलला mujmmil बाजूला केले. आरडाओरडा ऐकून घटनास्थळी काही लोक आले. तोपर्यंत गस्तीवर असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती मिळाली होती.
जमाव संतप्त होऊन मुजम्मिल mujmmil जाब विचारत होता. तेवढ्यात पोलिसही येत असल्याचे कळल्यानंतर त्याने सोबत आणलेला धारदार चाकू काढला. चाकू पाहून नागरिक मागे हटले. तेवढ्यात त्याने चाकूने स्वतःचा गळा कापला. काही नागरिकांनी धाव घेत मुजम्मिलला जवळील एमजीएम रुग्णालयात mgm hospital दाखल केले. घटनेची माहिती मिळताच सिडकोचे निरीक्षक अतुल येरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुजम्मिल जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. तो विवाहित असून पत्नी, दोन मुलांसह चिश्तिया परिसरात chistiya राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या नेमक्या कारणाचा रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. घटनेनंतर मुजम्मिलच्या कुटुंबाने रुग्णालयात धाव घेतली. गळ्याची नस कापली गेल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरू केली होती. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुण गेल्या चार-पाच दिवसांपासून आपला पाठलाग करत असल्याचे तरुणी सांगत होती.