दिपक नागरे / साखरखेर्डा.
साखरखेर्डा जवळच्या शिंदी येथील प्रदीप शेषराव इंगळे वय २८ या युवकाने राहत्या घरात पत्र्याला आधार देण्यासाठी असलेल्या अँगलला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवार २८ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मृतकाचा भाऊ संदिप इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.
प्रदिपच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. मृतक प्रदीप याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, आई असा परिवार आहे.