साखरखेर्डा येथे डेंग्यूसदृश तापेने घेतला परत युवकाचा बळी.आठवड्यातून तापेमुळे दुसरा मृत्यू. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.

 

 

 

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा या गावात डेंग्यू सदृश तापाची साथ सुरू आहे. आठवड्यातून डेंग्यू सदृश तापेने साखर खेर्डा येथील हा दुसरा बळी आहे. सविस्तर वृत असे की २१ ऑगस्ट रोजी डेंग्यू सदृश तापाने साखरखेर्डा येथील युवतीचा संभाजीनगर येथील  रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर २४ ऑगस्ट रोजी पुन्हा गावातील ३४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. आठवड्यातून दोघांचा मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. आरोग्य  विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

 

साखरखेर्डा परिसरात डेंग्यू सदृश तापाची साथ सुरू आहे. त्यामुळे,शासकीय आणि खासगी रुग्णालये रुग्णांनी भरले आहेत. २३ ऑगस्ट रोजी गावातील वार्ड क्रमांक सहा मधील अशोक कामाजी देवकर याला ताप आला. त्यांना तातडीने चिखली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा सल्ला दिला.

 

 

परंतू परिस्थिती नाजूक असल्याने अशोकला बुलढाणा येथे नेण्यात आले, मात्र, तेथे उपचार करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्राम पंचायतीने व सार्वजनिक आरोग्य विभागाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.