हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा बाजारात वाहनांचा गोंधळ; पोलिसांची धडक कारवाई

On: April 5, 2026 8:19 AM
Follow Us:
साखरखेर्डा आठवडी बाजारातील वाहतूक कोंडी आणि वाहनांची गर्दी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा |५ एप्रिल २०२६

साखरखेर्डा आठवडी बाजारात वाहनांचा गोंधळ आणि रोडवरच होणारी हर्रासी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी भरत असलेल्या या बाजारात सकाळीच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. अनेक वाहनधारक बसस्थानक परिसरातच मोटारसायकली उभ्या करत असल्याने एसटी बसच्या हालचालींना अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने धडक कारवाई करत नो-पार्किंगमध्ये उभ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून बाजारात शिस्त राखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

साखरखेर्डा ही मोठी बाजारपेठ असून परिसरातील ३५ ते ४० गावांचा संपर्क येथे येतो. त्यामुळे आठवडी बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. विशेषतः शुक्रवारी भाजीपाला आणि इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते.

मात्र बाजारात कोणतेही नियम पाळले जात नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. व्यापारी चक्क रस्त्यावरच मालाची हर्रासी करत असल्याने सकाळी ६ ते ९ या वेळेत रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होते. यामुळे नागरिकांना चालण्यासाठीही जागा राहत नाही.

या परिस्थितीची दखल घेत ठाणेदार गजानन करेवाड यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून वाहतूक नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवली. नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच अनेक वाहन चालकांना समज देण्यात आली.

या कारवाईमुळे बाजारात काही प्रमाणात शिस्त निर्माण झाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. विशेषतः महिला, जेष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्गाला याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, बाजारात भुरट्या चोरट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मोबाईल चोरी, सोन्याचे दागिने चोरी होण्याच्या घटना वाढल्या असून महिलांना विशेष फटका बसत आहे.

नागरिकांनी सकाळी होणारी हर्रासी बाजारातील ओट्यावरच करावी अशी मागणी केली आहे, जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल.

नागरिकांना आवाहन: बाजाराच्या दिवशी वाहने रस्त्याच्या बाजूला लावावीत. महिलांनी शक्यतो दागिने घालून येणे टाळावे आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.


👉 आमच्यासोबत अपडेट रहा

अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला रोज भेट द्या.

📲 WhatsApp वर अपडेट मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा.


📰 संबंधित बातम्या

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment