sakharkherda : दगडफेक प्रकरण भोवले ; ९ महिन्यातच साखरखेर्डा ठाणेदार नाईक यांची बदली…

sakharkherda

sakharkherda : तालुक्यातील साखरखेर्डा sakharkherda पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल नाईक swapnil naik यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. रिक्त झालेल्या त्यांच्या जागेवर यवतमाळ येथून बदलुन आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड gajanan karevad यांनी नेमणूक देण्यात आली असून त्यांनी पद्मार देखील स्विकारला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड यांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

 

 

 

शिरपूर येथे दोन वर्ष ठाणेदार म्हणून कामगिरी बजावली. यवतमाळ एलसीबीमध्ये नेमणूकीस असतांना त्यांनी रेमंड कंपनीतून चोरीस गेलेल्या दीड कोटी रुपयाच्या मालाचा छडा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. तसेच दिड क्विटल गांजा पकडुन कुविख्यात गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या. ट्रॅफिकमध्ये देखील त्यांनी यशस्वी कामगिरी करत वाहनधारकांना शिस्त लावली. सामाजिक ऐक्य अबाधित ठेवून समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यावर आपला भर राहणार आहे. सोशल पोलिसिंगद्वारे सामाजिक ऐक्य स्थापन करण्याकरिता योग्य त्या स्टेप्स घेण्यात येतील, असे सांगत आगामी काळात येणारे सण-उत्सव शांततेत पार पडण्याकरिता जनतेने पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन देखील ठाणेदार ‘गजानन करेवाड’ यांनी माध्यमातून केले.