साखरखेर्डा येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या.

साखरखेर्डा

 

 

साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवाजी नगर येथील एका तरुणाने घरातच गळफास लावून आत्यहत्या केली आहे. उपरोक्त घटना ही २० जुलै रोजी दुपारी घडली शिवाजी नगर येथील रहिवासी सुनिल सिध्दार्थ इंगळे वय ३५ हा कुटुंबासह राहातं होता. काही दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्याने तो एकटाच घरी राहातं होता.

 

 

 

२० जुलै रोजी दुपारी त्याने घरातील बल्लीला दोर बांधून गळफास लावून आत्यहत्या केली.ही वार्ता गावात पसरताच पोलीस पाटील यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली. पोलीसांनी मर्ग दाखल करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मेहकर येथे पाठविला आहे.