नारायणराव आरु पाटील,वाशिम/प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद येथील बसस्थानकावर श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे अनेक मुले,मुली शिक्षण घेण्यासाठी येत असतात पण अनेक चिडीमारी करणारी मुले बस स्टँडवर उभी राहतात.गाडीची उभ्या मुलीची वाट पाहण्यासाठी मुली बसस्थानकावर वाट पहात होत्या.त्यांची छेडछाड काढणे,नेहमी फोटो काढणे, व्हिडिओ काढणे इत्यादी कामे करत असतात.
याबाबत वाशिम पोलीस स्टेशनचे ठाणेदार व संबंधित दामिनी पथक यांनी दखल घेणे गरजेचे आहे. जर दखल घेतली नाही तर बदलापूर सारख्या महाराष्ट्रात घडत असलेल्या घटनाप्रमाणे वाढत जातील या बाबीसाठी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन व दामिनी पथक जबाबदार राहील रिठद येथील अशी माहिती आहे की रिठद येथील श्री शिवाजी विद्यालयाचे व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक श्री मारुती भिसडे सर हे बस स्टँड वर प्राध्यापकांच्या आदेशान्वये मुलींच्या सुरक्षितेसाठी व व्यवस्थित बस मध्ये बसून देण्यासाठी त्यांना तसे आदेशित केले होते.
व त्यांनी त्या आदेशाचे पालन केले असता चार मुलांनी या शिक्षकांसोबत हुज्जत घालून त्यांना मारहाण केली याबाबतची दखल ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी घ्यावी व दामिनी पथकाला प्रचारण करावे जर ही बाबीची दखल घेतली नाही तर संबंधित ग्रामीण पोलीस स्टेशन व दामिनी पथक जबाबदार असेल असे गावकऱ्यांच्या मते व पालवर्गाला सर्वांना वाटते तरी संबंधित चिडीमारी करणाऱ्या मुलांवर कार्यवाही करुन तात्काळ अटक करावी.
व प्रकाराला आळा बसेल. ही घटना घडल्यानंतर अचानक वाशिम पोलीस स्टेशनचे पोलीस राठोड साहेब , घुगे साहेब अचानक उपस्थित झाले व त्यांनी याबाबतची दखल घेतल्याचे सांगितले वृत्त लिहीपर्यंत पोलिस स्टेशनमध्ये कुठलीही तक्रार दाखल झाली नव्हती.