Risod | रिसोड मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात हालचालीनां वेग, चर्चांना उधाण.

 

 

नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी 

 

 

सध्या स्थिती रिसोड (risod) मतदार संघावर असलेला महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचा दावा चालू आहे.तसा भारतीय राष्ट्रीय काॅग्रेस पक्षाचा उमेदवार सतत निवडून येत असल्याने काॅग्रेसही दावेदारी करत आहे.आणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा ही उमेदवार उमेदवारी घेत आला.त्यातच महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेला घेण्यासाठी रिसोड मतदार संघातील काही शिवसेनेचे (पक्षप्रमुख उध्दव ठाकरे)नेते दिल्ली वारी करून आलेत, त्यामुळे जनतेमध्ये उत्सुकता आहे.

 

 

हि चर्चा रिसोड मतदार संघात आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला सुटेल किंवा कोण उमेदवार असेल. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात अंतर्गत हालचालींना चांगलाच वेग आलेला दिसतो. परंतु येणारा काळच ठरवेल हा मतदारसंघ पक्षश्रेष्ठी,महाविकास आघाडीत कोणता निर्णय घेतात. त्यावेळेस या अशाच चर्चांना पूर्णविराम मिळेल.