रिसोड बाजार मध्ये भाजीपाल्याचे भाव वाढल्याने मंदीचे सावट ! 

 

प्रतिनिधी /प्रदिप देशमुख

 

रिसोड (risod)  – बाजारपेठे मध्ये मंदीचे वातावरण आलेले आहे. आणि मागील झालेल्या सणामुळे शेतकरी व शेतकरी वर्गामध्ये कुठलेही शासनाने शेतकऱ्याला मदत न दिल्यामुळे. जे काही होणारे खर्च मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून बहिणींना येणारे पैसे त्यामधून 3000 मध्ये जे झालेले खर्च हे शेतकरी वर्गामध्ये जो येणारा पैसा हा दुष्काळी म्हणून पाच हजार रुपये येणार या अपेक्षांनी तीन हजार रुपये हे खर्च केले.

 

 

आणि आता कुठलाही पैसा शेतकऱ्यांना शेतीच्या लागणाऱ्या खर्चामध्ये अडचणी घेऊन राहिल्या व खर्च करून सुद्धा सोयाबीन उत्पन्नामध्ये कुठलीही अपेक्षा राहिलेली नाही. आणि हा खर्च पुढील पिकांमध्ये सुद्धा कसा करायचा हा सुद्धा प्रश्न पडला त्यामुळे गुरुवार बाजार हा नेहमीप्रमाणे असतो. पण आता खूप मंदीचं वातावरण आहे व व्यापारी वर्गामध्ये त्याचा खूप असर पडलेला आहे आणि दिवसभरामध्ये जो व्यापारी वर्गाला खर्च लागतो तो सुद्धा वसूल होणे अवघड झालेले आहेत.

 

 

रिसोड बाजारपेठ म्हणजे शेतकऱ्याच्या पूर्ण भरोशावर असलेली बाजारपेठ मानल्या जाते. बाहेरून गिऱ्हाईक खेड्यापाड्या वरून येणारे गिऱ्हाईक हेच रिसोड मध्ये व्यापारी वर्गाला आले तरच ग्राहक होते. अन्यथा सरकारी कर्मचारी हे कुठल्याही प्रकारचा शहरी विभागात व बाहेर जिल्ह्या ठिकाणी जाऊन खरेदी करतात. त्यामुळे ही बाजारपेठ सर्व खेडे पाडे असलेले जवळ 200 ते अडीचशे खेडे रिसोड भोवताल आहेत. त्यामुळे तीन तीन वेशीचं गाव मानल्या जाते त्यामुळे सर्वात मोठा तालुका म्हणजे रिसोड हा महाराष्ट्रात मोठा मानल्या जातो सर्व व्यापारी वर्गाचा पूर्ण भर रिसोड वर आहे.

 

 

कापड व्यापारी असो या किराणा व्यापारी असो या मोटर साहित्य व्यापारी असो हा सर्व वर्ग रिसोड शहराकडे यांची चलन आहे त्यामुळे त्यामुळे सर्व प्रश्न परेशान आहेत. पुढे कशा दुकानदाऱ्या चालायचा हा व्यापारी वर्कर चिंतेचे वातावरण आहे येथे सर्व होलसेल व्यापारी व सहकारी वर्ग सुद्धा भरपूर आहे पण शेतकऱ्यावरचा शिवाय दुसरं पर्याय नाही शेतकरी म्हणजे देशाचा पोशिंदा आहे. स्वस्त असो या महाग असो कधीच विचार करणारा शेतकरी वर्ग नाही.