रिसोड मधील लैंगिक अत्याचार करणारा मुख्य आरोपी गजाआड.

 

 

 

 

 

नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी 

 

रिसोड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरी फुपाटे या आरोपीला मराठवाड्यातील वाढोणा गावाजवळील जंगलातून जेरबंद करण्यात आल्याची माहिती रिसोड पोलिसांनी २५ ऑगस्टला दिली पिडीत मुलीचे वय १३ वर्षे ९ महिने असून रिसोड पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार २० ऑगस्टला रोजी सकाळी ७.३० वाजताचे दरम्यान तिन्ही आरोपीनी तिचे तोंड दाबून एका माळावरील झोपडी मध्ये नेले होते त्या प्रकरणात मुलीची पोलिसाचे माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे निष्पन्न झाले.

 

 

या प्रकरणातील आरोपी फरार असल्याने त्याला पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप घटे यांच्या पथकाने जलद गतीने चक्र फिरून आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या भावकीतील काही मित्र व कुटुंबातील लोकांना विश्वासात घेऊन गोपनीय माहीती मिळविण्यात पोलीस यशस्वी झाले. आणि रिसोड पासून २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या मराठवाड्यातील वाढोणा गावाजवळील नजीकच्या जंगलात आरोपींना पकडण्यासाठी सापळा असून आरोपी पंढरी यास जेरबंद केले.

 

 

जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप घटे व इतर सहकारी चमुंनी ही कामगिरी पार पाडली.