नारायणराव आरू पाटील,वाशिम/प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी रिसोड शहर व तालुक्याच्या वतीने मागील दहा दिवसांपूर्वी पोस्ट ऑफिस समोरील देशी दारू च्या दुकानाचा एनओसी रद्द करण्यात यावा अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले होते. सध्या महाराष्ट्रात महिलावर अत्याचारांच्या घटना वाढत आहे. देशी दारूच्या दुकानासमोरच पोस्ट ऑफिस, भूमी अभिलेख, तहसील कार्यालय व आजूबाजूला शाळा असल्यामुळे व जवळच बस स्टँड असल्यामुळे महिलांची व मुलींची खूपच गर्दी होताना दिसून येत आहे. त्याच रस्त्यावर विश्रामगृह, शासकीय कार्यालय व शासकीय निवासस्थाने आहेत.
नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सतत फोन द्वारे विचारणा केली असता माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्या देशी दारूच्या दुकानाला N. O. C देणे अथवा न देणे हा आपला अधिकार राखीव असल्याकारणाने वारंवार नगरपरिषदेला विनंती करूनही अशा गजबजलेल्या ठिकाणी देशी दारूच्या दुकानाला N. O. C मिळतेच कशी हा यक्षप्रश्न रिसोड येथील जनतेच्या मनामध्ये उपस्थित राहिला आहे. आता या निवेदनावर मुख्याधिकारी साहेब काय निर्णय घेतात देशी दारूच्या दुकानाची N. O. C रद्द करतात किंवा नाही याकडे जनतेचे लक्ष लागले होते परंतु विषय अतिशय गंभीर असूनही प्रशासन बधिर झाले आहे.
प्रशासनाने अपेक्षित सहकार्य न केल्यामुळे जन हितासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष सय्यद अकील व शहर अध्यक्ष मोहम्मद आसिफ यांच्या नेतृत्वात 28 ऑगस्ट बुधवार पासून त्या देशी दारूच्या दुकानाला दिलेली परवानगी रद्द होईपर्यंत आमरण उपोषण करण्यात येत आहे.